ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात मुसळधार; महाड-रोहा-नागोठणे पुरमय, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे शहरात पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. तर पावसामुळे काल, 2 ऑगस्टला रात्री साडेदहा वाजता मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली. ही दरड मध्यरात्री साडेतीन वाजता काढण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

जिल्ह्यात पुरमय परिस्थिती
author img

By

Published : Aug 3, 2019, 9:15 AM IST

Updated : Aug 3, 2019, 9:37 AM IST

रायगड - जिल्ह्यात शुक्रवार सकाळपासूनच पावसाची धुव्वादार बॅटिंग सुरू असून रात्रभर पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहरात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. नागोठण्यातील बाजारपेठेत साडेतीन फुटापर्यंत पाणी साचले आहे. रोह्यातील रोठखुर्द व आंबेवाडी येथील 70 लोकांचे पाणी भरल्याने स्थलांतर करण्यात आले आहे. पाली पुलावर पाणी आल्याने वाकण खोपोली वाहतूक बंद तर महाड-रायगड रस्ताही पाण्याखाली गेला आहे. यामुळे जिल्ह्यात पुरमय परिस्थिती निर्माण झाली आहे.तसेच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. तर पावसामुळे काल, 2 ऑगस्टला रात्री साडेदहा वाजता मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली. ही दरड मध्यरात्री साडेतीन वाजता काढण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

जिल्ह्यात पुरमय परिस्थिती

महाड, सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील बाजारपेठेत पाणी शिरले आहे. नागोठणे शहरात अंबा नदीनेही शहरात शिरुन साडेतीन फुटापर्यंत पाणी पातळी गाठली आहे. रोहा शहरातील कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तर नवीन पुलाच्या उंचीपर्यंत पाणी पोहोचल्याने, शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. तर अष्टमीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे अलिबाग रोहा हा रस्ता बंद झाला आहे.

पाली पुलावर पाणी साचल्याने वाकण मार्गे खोपोली रस्ता बंद करण्यात आली आहे. महाड-रायगड रस्त्यावरही पाणी साचले असल्याने हा रस्ता पाणीमय झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून नदी किनाऱ्यावरील गावांना तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Intro:
जिल्ह्यात महाड, रोहा, नागोठणे पुरमय परिस्थिती

वाकण पाली, अलिबाग रोहा, महाड रायगड रस्ता बंद

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

रायगड : जिल्ह्यात काल सकाळपासूनच पावसाची धुवादार बॅटिंग सुरू असून रात्रभर पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहरात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. नागोठणे मध्ये साडेतीन फुटापर्यंत पाणी बाजारपेठेत शिरले आहे. रोह्यातील रोठखुर्द व आंबेवाडी येथील 70 जणांचे पाणी भरल्याने स्थलांतर करण्यात आले आहे. पाली पुलावर पाणी आल्याने वाकण खोपोली वाहतूक बंद तर महाड रायगड रस्ताही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरमय परिस्थिती निर्माण झाली आहे.Body:जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शहरात पाणी घुसण्यास सुरवात झाली आहे. तर पावसामुळे काल 2 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली होती ही दरड मध्यरात्री साडेतीन वाजता काढली. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
Conclusion:महाड सावित्री नदीने इशारा पातळी गाठल्याने शहरात बाजारपेठेत पाणी घुसले आहे. नागोठणे शहरात अंबा नदीनेही शहरात घुसून साडेतीन फुटापर्यंत पाणी भरले आहे. रोहा शहरातील कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तर नवीन पुलाला पाणी लागले असल्याने शहरात पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. तर अष्टमीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. त्यामुळे अलिबाग रोहा हा रस्ता बंद झाला आहे.

पाली पुलावर पाणी साचल्याने वाकण मार्गे खोपोली रस्ता बंद केला आहे. महाड रायगड रस्त्यावरही पाणी साचले असल्याने हा रस्ता पाणीमय झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून नदीकिनारी गावांना तसेच सर्व यंत्रणेना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
Last Updated : Aug 3, 2019, 9:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.