ETV Bharat / state

१९३ मच्छीमार बोटी अजूनही समुद्रात; मत्स्य विभागाकडून तत्काळ किनाऱ्यावर येण्याचे निर्देश

समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना जिल्ह्यातील २७७ बोटी १३ मे रोजी मच्छीमारीसाठी गेल्या होत्या.

boats
मच्छीमार बोटी
author img

By

Published : May 14, 2021, 7:13 PM IST

रायगड - समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना जिल्ह्यातील २७७ बोटी १३ मे रोजी मच्छीमारीसाठी गेल्या होत्या. पुन्हा आज सकाळी १४ मे रोजी १७१ बोटी समुद्रात मच्छीमारीसाठी गेल्या आहेत. जिल्ह्यातील ४४८ बोटी पैकी २२५ बोटी ह्या पुन्हा किनाऱ्याला लागल्या आहेत. मात्र अद्यापही १९३ मच्छीमार बोटी ह्या समुद्रातच आहेत. मात्र शासनाच्या निर्देशाकडून दुर्लक्ष करून जिल्ह्यातील अनेक बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्याची बाब समोर आली आहे. या सर्व बोटींना तत्काळ किनाऱ्यावर येण्याचे निर्देश मत्सव्यवसाय विभागाकडून देण्यात आले आहेत.

मच्छीमारांचे प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष

हवामान विभागाने दिलेल्या दिलेल्या इशार्‍यानुसार १४ जानेवारीला ४० ते ५० किमी वेगाने, १५ तारखेला ताशी ४० ते ६० तसेच १६ तारखेला ताशी ६० ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, नागरिकांनी समुद्र किनार्‍यावर पोहण्यासाठी जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या असून, समुद्र व खाडी किनार्‍यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र वादळाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून रायगड जिल्ह्यातील अनेक मासेमारी नौका समुद्रात गेल्याची बाब समोर आली आहे.

हेही वाचा - 'लव्ह यू जिंदगी' म्हणाऱ्या तरुणीचा कोरोनाने घेतला बळी; नेटकरी झाले भावूक

रायगडच्या किनाऱ्याला फटका नाही पण १९३ बोटी अद्यापही समुद्रात

रायगड जिल्ह्यात १४ मे रोजी वादळाचा कोणताही फटका हा किनारपट्टीला बसला नसला तरी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अद्यापही १९३ बोटी समुद्रात आहेत. या सर्व बोटीना किनाऱ्यावर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात अलिबाग मधील १६९, उरण मधील २२ तर मुरुड मधील २ मच्छिमार नौकांचा समावेश आहे. उद्यापासून तीन दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व मच्छीमार संस्थांना याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत. रात्री उशीरा पर्यंत या बोटी परत येतील असा विश्वास सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सुरेश भारती यांनी व्यक्त केला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने वादळाचा इशारा देऊनही बोटी समुद्रात कशा गेल्या हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

हेही वाचा - 'स्पुटनिक-५' लसीची किंमत ९९५ रुपये प्रतिडोस; रेड्डी लॅब्सची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.