पनवेल - नवीन पनवेल ओव्हर ब्रिजवर एका कारने भर पावसात अचानक पेट घेतला. आज (२७ जुलै) दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कारने पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने कार थांबवून बाहेर पडला. यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला. बघता-बघता संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली. कारला आग नेमकी कशामुळे लागली, हे कळू शकले नाही. आग एवढी भीषण होती की अग्निशमन विभागाच्या गाडीला बोलवावे लागले आणि आग विझवण्यात आली.
या घटनेमुळे काही काळ नवीन पनवेल ओव्हर ब्रिजवर एकेरी वाहतूक सुरू होती. तर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार चालकाच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला. परंतु, या दुर्घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.