ETV Bharat / state

उरण ओएनजीसी अग्नितांडव : चार तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश; चार जणांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 3, 2019, 8:37 AM IST

Updated : Sep 3, 2019, 1:23 PM IST

ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटच्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.

उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला भीषण आग लागली आहे

रायगड - उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. 4 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या भीषण आगीत 3 ओएनजीसी जवानांसह 1 कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. ओएनजीसी कंपनीतील डायरेक्टर जनरल मॅनेजर सी. एन. राव यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला भीषण आग लागून ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

सी. एन. राव (वय 50) निवासी प्लांट सुपरवायझर, कॅप्टन इरान्ना युनियाप्पा नायका (वय ४८) सीआयएसएफ जवान, सतीश प्रसाद कुशवाह (वय ३६) सीआयएसएफ जवान झारखंड, महेंद्रकुमार फिरंगीप्रसाद पासवान (वय ३३)- सीआयएसएफ जवान उत्तर प्रदेश अशी मृतांची नावे आहेत. तर सीटी/फायर के. आर. महेश, सीटी/जीडी सिंधू राज अशी जखमींची नावे आहेत.

जमिनीखाली असलेल्या नाफता टाक्याच्या गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सुरक्षेसाठी ओएनजीसीपासून एक किलोमीटर परिसरात जाण्यास बंदी घातली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर चार तासांनी आग आटोक्यात आली आहे. येथील गॅस हाजिरा प्लांटकडे वळविण्यात आल्याची माहिती ओएनजीसीने ट्विटरवरून दिली आहे.

याआधीही फेब्रुवारी 2019 आणि डिसेंबर 2018 मध्ये येथील कंटनेर यार्डमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली होती.

Intro:Body:

रायगड

उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लान्टला आग

 मंगळवारी सकाळी

सात च्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक

माहिती 

अग्निशमन दलाच्या गाड्या

घटनास्थळी दाखक 

 या घटनेत तीन जण

गंभीर जखमी झाले आहेत

जखमींना तातडीने

नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

फेब्रुवारी 2019 आणि डिसेंबर 2018 मध्ये येथील

कंटनेर यार्डमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली

होती.

Conclusion:
Last Updated : Sep 3, 2019, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.