ETV Bharat / state

रायगड : 'निसर्ग'च्या फटक्याने कोलमडला नारळ-पोफळी बागायतदार

बुधवारी येऊन गेलेल्या (दि. 3 जून) निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात मोठे थैमान घातले होते. यात विविध ठिकाणच्या घरांची पडझड झाली. अनेक झाडे उन्मळून पडली तर अनेक शेतकऱ्यांच्या आंबा, नारळ अन सुपारीच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. यामळे बागायतदार कोलमडून गेला आहे.

नुकसानग्रस्त बाग
नुकसानग्रस्त बाग
author img

By

Published : Jun 6, 2020, 1:08 PM IST

रायगड - निसर्ग चक्रीवादळ बुधवारी रायगडात येऊन धडकले आणि धूळधाण करून गेले. अलिबाग तालुक्यालाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे. नारळी पोफळीच्या बागांनी नटलेले रेवदंडा, चौल नागाव ही गावे पडलेल्या झाडांनी ओसाड दिसू लागली आहेत. त्यामुळे येथील बागायतदार हा पूर्णतः कोलमडून गेला आहे.

बागायतदाराची प्रतिक्रिया घेताना प्रतिनिधी

मोठ्या कष्टाने वाढवलेली नारळ, पोफळीची बाग वादळाने डोळ्यासमोर कोलमडल्याने पुन्हा ती उभी कशी करायची हा यक्ष प्रश्न बागायतदारासमोर उभा ठाकला आहे. शासनाकडून या झाडांची पाहणी व्हावी. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी येथील बायागतदार करत आहेत.

हेही वाचा - #Cyclone 'निसर्ग' : वादळ परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.