रायगड - अलिबागला पर्यटनासाठी आलेली महिला तिची दोन मुले आणि एक व्यक्ती यांच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्हा हादरला होता. अलिबाग ब्लॉसम कॉटेजमधील आत्महत्या प्रकरणी ( Alibag Blossom Raigad suicide case ) नवा खुलासा पुढे आला आहे. मृतक महिला आणि पुरुष यांच्यातील विवाहबाह्य प्रेमसंबंधातून ही आत्महत्या आणि हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र पोलीस घटना कशामुळे घडली याचा तपास घेत आहेत.
असा लागला प्रकरणाचा छडा : मिळालेल्या माहितीनुसार कुणाल चिंतामण गायकवाड ( वय 29 वर्षे राहणार इंगवले मळा पुणे), प्रियंका संदीप इंगळे, ( वय 25 वर्षे ) भक्ती संदीप इंगळे, वय - 5 ), माऊली संदीप इंगळे ( वय - 3 राहणार-पैठण,तालुका-पैठण, औरंगाबाद) हे अलीबाग येथे पर्यटनासाठी आले होते. ब्लॉसम कोटेजमध्ये 11 मे रोजी त्यांनी खोली घेतली होती. मंगळवारी या चारही जणांपैकी कुणीही खोलीच्या बाहेर आले नसून कोणतीच हालचाल जाणवत नसल्याने, कॉटेज मालकाने खिडकीमधून पाहिले. यात महिला आणि पुरुषाने गळफास घेतले असल्याचे पाहायला मिळाले. याबाबत मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून माहिती घेतली. यावेळी मुलगा आणि मुलगी यांना विष पाजून हत्या केली असून, महिला आणि पुरुषाने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. सामानामधून प्राप्त आधार कार्डवरून त्यांच्या राहत्या ठिकाणाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मृतक पुरुष आणि महिला यांची हरवल्याची तक्रार पुणे, शिक्रापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहे. एकंदरीतच घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली असता, विवाहबाह्य प्रेमसंबंधातून हत्या आणि आत्महत्या झाली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र घडलेल्या या संपूर्ण प्रकाराबाबत संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे.
हेही वाचा - रायगड : तळवली गावाजवळ सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह