खालापूर (रायगड) - खालापूर पंचायत समिती कार्यालयाचे गेल्या काही महिन्यापासून दुरुस्ती व इमारतीच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना सभापतीच्या दालनाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाले आहे. गेल्या काही महिन्यापासून सभापती वृषाली पाटील यांना बसण्यासाठी स्वतंत्र दालन नसल्याने सभापती यांना उपसभापतींच्या दालनाचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे या इमारतीचे काम केव्हा पुर्ण होईल आणि सभापतींना पुन्हा स्वतंत्र हक्काचा दालन केव्हा मिळणार ही चर्चा सुरू होती. याबाबत सभापतींनी अनेकदा अधिकाऱ्यांना काम लवकरात लवकर करून घेण्याची ताकीत दिली. सभापतींच्या सूचनेकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळत होते. दरम्यान सभापतीची समस्या 'ईटीव्ही भारतने' जाणून घेत 21 जून रोजी बातमी प्रकाशित केली. ईटीव्ही भारतच्या बातमीची दखल घेत संबंधित अधिकारी व ठेकेदारानी तत्काळ दखल घेतली. बातमीची दखल घेत सभापतींच्या दालनाचे काम वेगाने सुरू झाले आहे.
'ईटीव्ही भारत' समूहाचे मानले आभार
स्वतंत्र दालना विना सभापतीची होणारी गैरसोय लक्षात घेताना अधिकाऱ्यांना लवकरात लवकर दुरुस्तीचे काम करण्यासाठी ताकीद वेळोवेळी दिली. मात्र संबंधित अधिकारी वर्गाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे अनेक महिन्यापासून दुरुस्तीचे काम खोळंबले होते. याबाबत सभापतीची समस्या जाणून घेत ईटीव्ही भारतने 21 जून रोजी बातमी प्रकाशित केली. याच बातमीचामुळे संबंधित प्रशासनाला खडबडून जाग आली. दरम्यान आता सभापतींच्या दालनाच्या कामाला गती मिळाली आहे. तसेच काही दिवसातच हे काम पुर्णत्वास येईल, असेही सांगण्यात आले आहे. शिवाय सभापतींनी 'ईटीव्ही भारतचे' आभार मानले आहे.
हेही वाचा -खालापूर पंचायत समितीच्या सभापतींना उपसभापतींच्या कॅबिनचा आधार!