रायगड - नागावजवळ पोल बसविण्याचे काम सुरु असल्यामुळे ग्रामस्थांनी चक्क केंद्रिय पथकाची वाट अडवली. या घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांची एकच तारांबळ उडताना दिसून आली.
हे केंद्रीय पथक नागाव येथील नुकसान झालेल्या शाळेची पाहणी करायला आले होते. पाहणी झाल्यावर ते पुढे नागावकडे जात होते. तर दुसरीकडे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थ हे रस्त्याच्या बाजूला पोल बसविण्याचे काम करीत होते. या प्रकारामुळे पथकाच्या ताफ्याला दहा मिनिटे ताटकळत राहावे लागले. यावेळी रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांची एकच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. तर ग्रामस्थांनी काम होत नाही तोपर्यंत जेसीबी हलवणार नाही, असा पवित्रा घेतला. तसेच या अधिकाऱ्यांसमोर 15 दिवसांपासून वीज नाही, पाणी नाही, अशी व्यथा मांडली. दरम्यान, वीज पोल लावल्यानंतर रस्ता मोकळा करून हे केंद्रीय पथक पुढे रवाना झाले.
हेही वाचा - नद्यांच्या पुनरुज्जीवनाने नागपूरच्या वैभवात भर, नाग नदीसह पिवळ्या नदीला मिळाले मूळ स्वरूप