ETV Bharat / state

सुनील तटकरे विरोधात दोन सुनील तटकरे तर अनंत गीतेंविरोधात अनंत गीते

विरोधकांनी एकमेकांविरोधात डुप्लिकेट उमेदवार उभे करण्याची खेळी खेळली आहे. यामध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म असलेले उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत.

सुनील तटकरे आणि अनंत गीते
author img

By

Published : Apr 5, 2019, 1:12 PM IST

रायगड - लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची ४ एप्रिल ही शेवटची तारीख होती. अखेरच्या दिवशी रायगड लोकसभा मतदारसंघातून आज १४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली आहेत. मात्र, विरोधकांनी एकमेकांविरोधात डुप्लिकेट उमेदवार उभे करण्याची खेळी खेळली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म असलेले उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत.

रायगड जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत डुप्लिकेट उमेदवार उभे करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे. यावेळीही ही खेळी राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधात खेळली आहे. आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म असलेल्या सुनील पांडुरंग तटकरे व सुनील सखाराम तटकरे या दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. तर 3 एप्रिल रोजी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या नाम साधर्म असलेल्या अनंत पद्मा गीते यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेचे गीते तर आघाडीचे तटकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.

२१०४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनील शाम तटकरे या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधकांनी अपक्ष सुनील तटकरेला उभा केल्याने त्याने ९८४९ मते घेतली होती. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे विरोधात ही खेळी खेळली आहे. यावेळी एक नव्हे तर दोन अपक्ष सुनील तटकरे उभे केले आहेत. त्यामुळे या नाम साधर्म्यमुळे सुनील तटकरे याच्या मतांवर परिणाम होणार आहे. तर शिवसेनेचे अनधिकृत उमेदवार अनंत गीते याच्या नाम साधर्म असलेला डुप्लिकेट अनंत गीते निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे याचा फटका अनंत गीते यांनाही काही प्रमाणात बसणार आहे.

अखेरच्या दिवशी दाखल झालेले अर्ज

तटकरे सुनील सखाराम (अपक्ष), सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), घाग संजय अर्जुन (अपक्ष), विलास गजानन सावंत (महाराष्ट्र क्रांती सेना), सचिन भास्कर कोळी ( वंचित बहुजन आघाडी), गजेंद्र परशुराम तुरबाडकर, (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके ( भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील (अपक्ष), रामदास दामोदर कदम (अपक्ष), तटकरे सुनील पांडुरंग ( अपक्ष), अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष), योगेश दीपक कदम ( अपक्ष), गायकवाड अनिल बबन (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) या १४ उमेदवारांनी ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेचे उमेदवार अनंत गंगाराम गीते यांच्यावतीने सुचकांनी आणखी दोन अर्ज भरले, तर सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी) यांनी आज आणखी एक अर्ज भरला आहे.

Raigad
अखेरच्या दिवशी रायगड लोकसभा मतदारसंघातून आज १४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केले.

उमेदवार अर्ज भरण्याची 4 एप्रिल ही शेवटची तारीख होती. त्यामुळे आता एकूण अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या २६ इतकी झाली आहे. आज ५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.

Intro:

सुनील तटकरे विरोधात दोन सुनील तटकरे तर अनंत गीते विरोधात अनंत गीते

नाम साधर्म अपक्ष उमेदवार अधिकृत उमेदवारांची वाढवणार डोकेदुखी

अखेरच्या दिवशी १४ उमेदवारांचे अर्ज सादर

एकूण २६ उमेदवार, 5 एप्रिलला छाननी

रायगड : 32 रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १४  उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली. यामध्ये आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नाम साधर्म असलेल्या सुनील पांडुरंग तटकरे व सुनील सखाराम तटकरे या दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. तर 3 एप्रिल रोजी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या नाम साधर्म असलेल्या अनंत पद्मा गीते यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेचे गीते तर आघाडीचे तटकरे यांची डोकेदुखी यामुळे वाढली आहे.

उमेदवार अर्ज भरण्याची 4 एप्रिल ही शेवटची तारीख होती. त्यामुळे आता एकूण अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या २६ इतकी झाली आहे. आज ५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
आज तटकरे सुनील सखाराम (अपक्ष), सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), घाग संजय अर्जुन( अपक्ष), विलास गजानन सावंत ( महाराष्ट्र क्रांती सेना), सचिन भास्कर कोळी,( वंचित बहुजन आघाडी), गजेंद्र परशुराम तुरबाडकर, (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके, ( भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील, (अपक्ष), रामदास दामोदर कदम (अपक्ष), तटकरे सुनील पांडुरंग ( अपक्ष), अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष), योगेश दीपक कदम ( अपक्ष), गायकवाड अनिल बबन ( अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) या 14 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेचे उमेदवार अनंत गंगाराम गीते यांच्यावतीने सुचकांनी आणखी दोन अर्ज भरले तर सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी) यांनी आज आणखी एक अर्ज भरला आहे.Body:2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील श्याम तटकरे या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधकांनी या अपक्ष सुनील तटकरेला उभा केल्याने त्याने 9849 मते 2014 च्या लोकसभा निवडणुकीत घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा यावेळी विरोधकांनी ही खेळी आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात खेळली असून यावेळी एक नव्हे तर दोन अपक्ष सुनील तटकरे उभे केले आहेत. त्यामुळे या नाम साधर्म्यमुळे सुनील तटकरे याच्या मतावर परिणाम होणार आहे.Conclusion:तर शिवसेनेचे अनधिकृत उमेदवार अनंत गीते याच्या नाम साधर्म असलेला डुप्लिकेट अनंत गीते निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे या नाम साधर्मचा फटका शिवसेनेचे अनंत गीते यांनाही काही प्रमाणात बसणार आहे.

रायगड जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत डुप्लिकेट उमेदवार उभे करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे. त्यामुळे यावेळीही ही खेळी राजकीय पक्षांनी एकमेकविरोधात खेळली आहे. त्यामुळे याचा फायदा व तोटा कुणाला होणार हे मतपेटीमधून कळणारच आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.