ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील 16 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान

रायगड जिल्ह्यातील भात आणि फळ शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. १६ हजार हेक्टर क्षेत्रातील शेती पावसामुळे बाधीत झाली आहे.

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील भात शेती बाधीत
author img

By

Published : Sep 19, 2019, 12:38 PM IST

रायगड - जिल्ह्यात यावर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात पावसाने हाहाकार उडवला असून अजूनही पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 1519 गावांमधील 16 हजार 534 हेक्टर क्षेत्रावरील भात शेती, भाजीपाला, आंबा बागायतींचे नुकसान झाले आहे. नवीन शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 20 हजार 400 रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन एकर आणि गुंठ्यांत असल्याने तुटपुंजा मोबदला यामुळे मिळण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील भात शेती बाधीत

रायगड जिल्ह्यात 1 लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा 1 लाख 4 हजार हेक्टरवर भातलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठड्यात अतिवृष्टी झाल्याने आणि शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे खाचरांमध्ये पाणी साचून राहीले. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे जमीन खरडून गेली. बांध फुटले, उधाणाचे पाणी आले. शेतामध्ये माती भरली, दगड गोटे आले, त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. एकूण क्षेत्राच्या 20 टक्के क्षेत्रावरील भात शेतीचे नुकसान झाले आहे.

1519 गावांमधील 16 हजार 532 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. भात शेतीचे 16 हजार 394 हेक्टर, पालेभाजी 35 हेक्टर तर फळबाग 36 हेक्टरवर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यंदा हेक्टरी 20 हजार 400 रूपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

अलिबाग तालुक्यात 178 गावांमधील 4 हजार 397 हेक्टर क्षेत्रावार भात शेतींचे नुकसान झाले आहे. पेण तालुक्यात 158 गावांध्ये 4 हजार 863 हेक्टर, मुरूड 290 हेक्टर, खालापूर 204 हेक्टर, कर्जत 982 हेक्टर, पनवेल 1230 हेक्टर, उरण 337 हेक्टर, माणगाव 1389 हेक्टर, तळा 126 हेक्टर, रोहा 1256 हेक्टर, सुधागड 92 हेक्टर, महाड 1039 हेक्टर, पोलादपूर 49 हेक्टर, म्हसळा115 हेक्टर, श्रीवर्धन 19 हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे 1 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार करण्यात आले आहेत. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.

Intro:

अतिवृष्टीमुळे रायगडात 16 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान

प्रति हेक्टरी 20 हजार 400 रुपये मिळणार नुकसान भरपाई

रायगड : जिल्ह्यात यावर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात पावसाने हाहाकार उडविला असून अजूनही पाऊस जाण्याचं नाव घेत नाही. दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 1519  गावांमधील 16 हजार 534 हेक्टर क्षेत्रावरील   भात शेती, भाजीपाला, आंबा बागयतींचे नुकसान झाले आहे. नवीन शासन निर्णयानुसार  शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 20 हजार 400 रूपये नुकसानभरपाई देण्यात आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन ही एकर आणि गुंठ्यांत असल्याने तुटपुंजा मोबदला यामुळे मिळण्याची शक्यता आहे.Body:रायगड जिल्ह्यात 1 लाख 23 हजार हेक्टर भात  लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा 1 लाख 4 हजार हेक्टरवर भातलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या  आठड्यात अतिवृष्टी झाल्याने व पाण्याचा निचरा न झाल्यामुळे खाचरांमध्ये पाणी साचून राहीले. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे जमिन खरडून गेली. बांध फुटले, उधाणाचे पाणी आले. शेतामध्ये माती भरली. दगड गोटे आले. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. एकूण क्षेत्राच्या 20  टक्के क्षेत्रावरील भात शेतीचे नुकसान झाले आहे.

1519 गावांमधील 16 हजार 532 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. भात शेतीचे 16 हजार 394  हेक्टर, पालेभाजी 35 हेक्टर तर फळबाग 36  हेक्टरवर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यंदा हेक्टरी 20 हजार 400 रूपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. 

अलिबाग तालुक्यात 178 गावांमधील 4 हजार 397 हेक्टर क्षेत्रावार भात शेतींचे नुकसान झाले आहे. पेण तालुक्यात 158 गावांध्ये 4 हजार 863 हेक्टर, मुरूड  290 हेक्टर,  खालापूर 204 हेक्टर,  कर्जत 982 हेक्टर,  पनवेल 1230 हेक्टर,  उरण 337 हेक्टर,  माणगाव 1389 हेक्टर, तळा 126 हेक्टर, रोहा 1256 हेक्टर, सुधागड 92 हेक्टर, 
महाड 1039 हेक्टर, पोलादपूर 49 हेक्टर, म्हसळा115 हेक्टर, श्रीवर्धन 19 हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. 
Conclusion:अतिपावसामुळे रायगड जिल्ह्यात  झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे 1 सप्टेंबर  2019 च्या शासन निर्णयानुसार करण्यात आले आहेत. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. "

-        पांडूरंग शेळके, जिल्हा अधीक्षक कृषि आधिकारी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.