रायगड - सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असल्याने अनेक गणेशभक्त वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी धावपळ करत आहेत. मात्र, वरदविनायकाचे मंदिर बंद असल्याने भक्तांचा हिरमोड झाला आहे. हे कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर, अशी प्रार्थना गणेशाचरणी करण्यात येत आहे.
मंदिर बंद असल्याने भक्तांमध्ये नाराजी -
अष्टविनायक क्षेत्रापैकी मानाचा गणपती म्हणून महडच्या वरदविनायकची ओळख असून असंख्य भक्त येथे दर्शनासाठी येतात. परंतु कोरोनाने डोके वर काढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक नियमावली लावली आहे. त्यामुळे वरदविनायकाचे मंदिर बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने गेल्या काही महिन्यापासून मंदिर बंद झाल्याने अनेक अनेक भक्तांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर मंदिर बंद झाल्याने याठिकाणच्या व्यापारी वर्गासमोर मोठे संकट ओढावले आहे.