ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन हे मैदान सोडून पळ काढणारे नेते - मुख्यमंत्री - अनंत गीते

पेण येथे महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचार सभा आयोजित केली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, मनसे या पक्षाच्या नेत्यावर तोंडसुख घेतले.

मुख्यमंत्री आणि अनंत गीते
author img

By

Published : Apr 18, 2019, 10:02 PM IST

Updated : Apr 18, 2019, 11:07 PM IST

रायगड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅप्टन क्रिकेटच्या मैदानात उतरून विकेटपर्यंत जातात आणि पॅव्हेलीनमध्ये परतून मी बारावा खेळाडू म्हणून बाहेर राहतो, असे सांगतात. त्यामुळे कॅप्टननेच मैदान सोडून पळ काढल्यामुळे तुम किस खैत की मूली हो, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुनील तटकरेंना लगावला. ते आज पेणमध्ये महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री

देशाला विकासाकडे कोण घेऊन जाऊ शकतो, यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व इतर पक्ष मिळून महाआघाडी केली आहे. मात्र, ही महाआघाडी नसून खिचडी आघाडी आहे. याचे नेते राहुल गांधी असून त्यांनी जाहीरनाम्यात गरिबांना ७२ हजार रूपये देणार, असे सांगितले आहे. पण कुठून आणि कसे देणार? याबाबत त्यांनी काहीच कल्पना दिली नाही. याचे आजोबा, आजी, वडील पंतप्रधान झाले. मात्र, गरिबी हटली नाही. त्यामुळे तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी गांधींवर केली.

ते म्हणाले, काँग्रेसला ६० वर्षे संधी देऊनही सामान्य जनतेचे त्यांनी भले केले नाही. त्यांनी फक्त आपल्या नेत्यांना मोठे केले. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची भाषणे म्हणजे मनोरंजनाचे साधन आहे. या सभेला अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री रवींद्र पाटील, महेश मोहिते, जिल्हाप्रमुख किशोर जैन आणि सुरेंद्र म्हात्रे उपस्थित होते.

शेकापने आपले नाव भाकाप ठेवावे

शेकाप हा एकेकाळी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष म्हणून काम करत होता. मात्र, आता हा पक्ष भांडवलदारांचा पक्ष झाल्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून भाकाप ठेवावे, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.

मनसेच इंजिन बंद पडलेले

एकेकाळी मोटार सायकल, सायकल भाड्याने मिळत होते. पण आता इंजिन भाड्याने मिळत आहे. हेच इंजिन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाड्याने घेतले आहे. मात्र, पवारांनी बंद पडलेले इंजिन भाड्याने घेतलेले आहे. त्यामुळे याचा उपयोग त्यांना होणार नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर केली.

Intro:
राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन हे मैदान सोडून पळ काढणारे नेते

शेकापने पक्षाचे नाव बदलून भाकाप ठेवा

मनसेचे इंजिन बंद पडलेले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फटकेबाजी

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅप्टन क्रिकेटच्या मैदानात उतरून विकेटपर्यत जातात आणि पॅव्हेलीनमध्ये परतून मी बारावा खेळाडू म्हणून बाहेर राहतो असे सांगतात. त्यामुळे कॅप्टननेच मैदान सोडून पळ काढला असताना तुम किस खैत की मुली हो असा उपरोधीक टोला सुनील तटकरे याना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला.

पेण येथे महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचार सभा आयोजित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, मनसे या पक्षाच्या नेत्यावर तोंडसुख घेतले. यावेळी उमेदवार अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रवीण दरेकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री रवींद्र पाटील, महेश मोहिते, जिल्हाप्रमुख किशोर जैन, सुरेन्द्र म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित होते. Body:यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणात म्हटले की, ही निवडणूक देशाला विकासाकडे कोण घेऊन जाऊ शकतो यासाठी ही निवडणूक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व इतर पक्ष मिळून महा आघाडी केली आहे. मात्र ही महा आघाडी नसून खिचडी आघाडी आहे. याचे नेते राहुल गांधी असून त्यांनी जाहीरनाम्यात गरिबांना 72 हजार देणार असे सांगितले आहे. पण कुठून व कसे देणार याबाबत काहीच कल्पना नाही. याचे आजोबा, आजी, वडील पंतप्रधान झाले मात्र गरिबी हटली नाही. त्यामुळे तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार असा टोला राहुल गांधी यांना मुख्यमंत्री यांनी मारला.

काँग्रेसला साठ वर्ष संधी देऊनही सामान्य जनतेच भले केले नाही फक्त आपल्या नेत्यांना मोठं केलं. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची भाषण म्हणजे फक्त मोदीना विरोधी. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची भाषण म्हणजे मनोरंजनाचे साधन झाले आहे. विकासाच्या बाबतीत शून्य असल्यामुळे त्यांचा उमेदवार निवडून येणार नाहीत. त्याचबरोबर भाजपाने पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी आपल्या भाषणात मांडला.Conclusion:शेकापने पक्षाचे नाव बदलून भाकाप करावे

शेकाप हा एकेकाळी शेतकरी व कामगारांचा पक्ष म्हणून काम करीत होता. मात्र आता हा पक्ष भांडवलदारांचा पक्ष झाला असल्याने पक्षाने आपल्या पक्षाचे नाव बदलून भाकाप ठेवा असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकापला मारला आहे.
-------------------------------------
मनसेच इंजिन बंद पडलेले

एकेकाळी मोटार सायकल, सायकल भाड्याने मिळत होते. पण आता इंजिन भाड्याने मिळत आहे. हेच इंजिन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंजिन भाड्याने घेतले आहे. मात्र शरद पवार यांनी बंद पडलेले इंजिन भाड्याने घेतलेले आहे. त्यामुळे याचा उपयोग त्यांना होणार नाही. असाही टोला फडणीवस यांनी आपल्या भाषणातुन राज ठाकरे यांना मारला.
Last Updated : Apr 18, 2019, 11:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.