ETV Bharat / state

लाचप्रकरणात सुधागडमधील दुय्यम निबंधकाला अटक

फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रायगडच्या सुधागड येथील दुय्यम निबंधक जितेंद्र वाईकर याला अटक करण्यात आली आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

author img

By

Published : Apr 16, 2021, 10:07 PM IST

लाचप्रकरणात सुधागडमधी दुय्यम निबंधकाला अटक

रायगड - फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रायगडच्या सुधागड येथील दुय्यम निबंधक जितेंद्र वाईकर याला अटक करण्यात आली आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे पाली इथं फ्लॅट आहे. या फ्लॅटचे दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशन करायचे होते. या कामासाठी वाईकर याने त्याचे हस्तक महंमद गुलाम शेख व राजेश राठोड यांच्या माध्यमातून 24 हजारांची लाच मागितली होती. मात्र 20 हजारांवर तडजोड करण्यात आली.

चौघांविरोधात गुन्हा दाखल

या संदर्भात तक्रारदार यांनी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली होती. आज 16 एप्रिल रोजी ही रक्कम देण्याचे निश्चित झाले होते, त्यानुसार रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. आज दुपारी आपल्या कार्यालयात ही रक्कम वाईकर याच्या वतीने राजेश राठोड याने स्वीकारली. दरम्यान लाच स्वीकारताना तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. याप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र वाईकरसह कार्यालयातील खासगी कर्मचारी हरेष ठाकूर, महंमद गुलाम शेख आणि राजेश राठोड यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - सरसंघचालक मोहन भागवतांना कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज, विलगीकरणात राहण्याच्या सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.