ETV Bharat / state

अदितीचे वडील डोक्यावर बसून काम करून घेतात, अजित पवार यांची भाषणातून मिश्किल टिप्पणी - अदिती तटकरे

रायगडच्या विकासासाठी श्रीवर्धनच्या आमदार आणि पालकमंत्री अदिती तटकरे ही सतत माझ्या मागे लागून काम करून घेते. कमी पडलं तर तिचा बाप सुनील तटकरे हे डोक्यावर बसून काम करून घेतात. अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी आपल्या भाषणात केली.

Deputy Chief Minister Ajit Pawar
Deputy Chief Minister Ajit Pawar
author img

By

Published : Jun 4, 2021, 7:02 PM IST

Updated : Jun 4, 2021, 7:14 PM IST

रायगड - रायगडच्या विकासासाठी श्रीवर्धनच्या आमदार आणि पालकमंत्री अदिती तटकरे ही सतत माझ्या मागे लागून काम करून घेते. कमी पडलं तर तिचा बाप सुनील तटकरे हे डोक्यावर बसून काम करून घेतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे हे सरचिटणीस आहेत. निवडणुकीत तिकीट देण्याची जबाबदारी त्याच्या हातात आहे. त्यामुळे मला त्याचे काम करणे गरजेचे आहे, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात केली. त्यांच्या या वाक्यावर एकच हशा पिकला.

अजित पवार यांची भाषणातून मिश्किल टिप्पणी
अदितीच्या कामाचे कौतुक -
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या आणि नगरपरिषद समुद्रकिनारी सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर रवींद्र राऊत विद्यालयात छोटेखानी कार्यक्रमात अजित पवार यांचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी मिश्किल खळी तटकरे यांच्यावर मारली. अजित पवार यांनी अदितीच्या कामाचे कौतुकही यावेळी केले.
अदितीचे वडील डोक्यावर बसून काम करून घेतात -
श्रीवर्धन तसेच रायगडच्या विकास कामासाठी अदिती तटकरे या झटून काम करत आहेत. विकासकामांच्या बाबत अदिती ही सतत माझ्या मागे लागून बैठक घेण्यास सांगते. तर अदितीचे वडील सुनील तटकरे हे डोक्यावर बसून कामे करून घेतात. नुकतीच कोकणातील बंदराच्या विकासाबाबत बैठक घेऊन त्यासाठी 700 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे तटकरे कुटूंब हे रायगडच्या विकासासाठी किती झटत आहे, याचे उदाहरण अजित पवार यांनी आपल्या भाषणातून दिले आहे.

Last Updated : Jun 4, 2021, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.