रायगड - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला खालापूर पेण मार्ग जोडला आहे. या रस्त्याला लागून खालापूर पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अनधिकृत बांधकाम झाल्याने अपघाताची शक्यता वाढली होती. नगरपंचायत प्रशासनाने ते अनधिकृत बांधकाम हटवले.
नगरपंचायत प्रशासनाची आक्रमक भूमिका
अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नगरपंचायत प्रशासनाने वतीने वेळोवेळी पत्र व्यवहार केले. तरी देखील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत अनधिकृत बांधकाम तसेच कायम ठेवल्याने 29 जानेवारीला दुपारच्या सुमारास नगरपंचायत प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आणि पोलीस बंदोबस्त ठेवत मुख्याधिकारी सुरेखा भगणे व नगर अंभियता देवेंद्र मोरखडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहायाने हटवले. अनेकांनी नगरपंचायतीच्या या बेधडक कारवाईचे कौतुक केले.
या कारवाई दरम्यान मुख्याधिकारी सुरेखा भगणे, कार्यालय अधिक्षक त्रिंबक देशमुख, नगर अभियंता देवेंद्र मोरखडीकर, लेखाधिकारी, सुरेश पोशतांडेल, कर निरिक्षक गोविंद भिसे आदीसह नगरपंचायत कर्मचारी व पोलीस यंत्रणा उपस्थित होती.
हेही वाचा - पोलिसांचा गोळीबाराचा होतोय सराव, कार्ले ग्रामस्थांच्या जीव मात्र टांगणीला
हेही वाचा - मुलांचे शारीरिक अन् मानसिक आरोग्य सुधारणे गरजेचे