ETV Bharat / state

वर्षांपासून रुग्णांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाईची मागणी - pen raigad news

त्याच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी पेण डेंटल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

raigad-doctor
raigad-doctor
author img

By

Published : Mar 16, 2021, 7:13 PM IST

पेण (रायगड) - पेण तालुक्यातील वाशी गावात मागील अनेक वर्षांपासून श्री गजानन डेंटल क्लिनिक या दवाखान्यात बोगस दंत चिकित्सक म्हणून कार्यरत असलेल्या जयेश म्हात्रे याच्याकडे दंत चिकित्सक म्हणून कोणतीही पदवी अथवा कायद्देशीर परवाना नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी पेण डेंटल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र या बाबत वडखळ पोलिसांकडे 18 फेब्रुवारी 202 ला तक्रार करून देखील अद्याप कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याने उघड झाले आहे.

अधिकृत मान्यता नाही

स्वतःला डॉक्टर म्हणून मिरवणारा जयेश म्हात्रे हा मागील दहा ते बारा वर्षांपासून पेण तालुक्यातील वाशी गावात श्री गजानन डेंटल क्लिनिक या दवाखान्यात दंत चिकित्सक (डेंटिस्ट) म्हणून क्लिनिक चालवत आहे. कोणतीही अधिकृत मान्यता नसतानादेखील दातांच्या विकारावर सर्जरीसारखे उपाय बिनदिक्कतपणे करून रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम तो करत आहे. संशय आल्याने पेण डेंटल असोसिएशनने याबाबत माहिती घेतली असता जयेश याचा चुलत भाऊ डॉ. रुपेश म्हात्रे हा पनवेल येथे वैद्यकीय व्यवसाय करत असून त्याच्या नावाखाली जयेश हा वाशी येथे बेकायदेशीरपणे व्यवसाय चालवित असल्याचे निदर्शनास आले.

डॉक्टर नसल्याचे स्पष्ट

मागील फेब्रुवारी महिन्यात याबाबत पेण डेंटल असोसिएशनने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार केली, मात्र आज महिना होत आला तरी जयेश याच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आली नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी डेंटल असोसिएशनने पेण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा म्हात्रे यांच्याकडेही तक्रार केली. त्यांनी केलेल्या चौकशीत जयेश हा डॉक्टर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नाही, रजिस्ट्रेशन नंबर नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.