ETV Bharat / state

तळई गावात संकटकाळातही शासनाकडून दिरंगाई; प्रवीण दरेकरांचा आरोप

स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांकडून मदतकार्य सुरु असून संकटकाळात शासनाची बेपर्वाही दिसून येते, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. ते सकाळपासून त्या गावातच आहे. तसेच माजी मंत्री गिरीष महाजन, आमदार निरंजन डावखरे सुध्दा उपस्थित आहे.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर
author img

By

Published : Jul 23, 2021, 7:32 PM IST

महाड (रायगड) - तळई गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिशय हृदय हेलावणारी अशी घटना या गावात घडली आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांकडून मदतकार्य सुरु असून संकटकाळात शासनाची बेपर्वाही दिसून येते, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. ते सकाळपासून त्या गावातच आहे. तसेच माजी मंत्री गिरीष महाजन, आमदार निरंजन डावखरे सुध्दा उपस्थित आहे.

तळई गावात संकटकाळातही शासनाकडून दिरंगाई

ही शरमेची बाब -

गुरुवारी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली आहे. ४ वाजल्यापासून आज दुपारपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी किंबहुना गावाचा तलाठी सुद्धा पोहोचला नाही. आज सांगतात संपर्क साधू शकत नाही नेटवर्क प्रॉब्लेम आहे. दळणवळणेला चालना देत महाड येथून बोटीने येण्याची आवश्यकता होती. एनडीआरएफची टीम उशीरा पोहोचली. ठाणे येथून तरुण मुले मदतीला आली. दिलासा देण्याचे काम त्या तरुणांनी केले. ग्रामस्थांना स्थलांतर करत त्याना तिथून बाहेर काढले त्यामुळे दिलासा मिळाला. प्रशासकीय अधिकारी न येणे ही शरमेची गोष्ट आहे. अनेक दिवसांपासून हवामान अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट दिल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

मदतीऐवजी पंचनामे करून घ्या -

कोकणात सुविधा बळकट करा, त्यांना अगोदरच स्थलांतरित करण्यात आले नाही. त्यामुळे हे जीव गेले. अगोदरच जर टीम आली असती तर आज हे निष्पाप जीव वाचले असते. परंतु एवढी बेपर्वाई प्रशासनाची लोकांचे जीव घेण्यापर्यंत कधीच पाहिली नाही. सरकार ५ लाख देतील १० लाख देतील. परंतु गेलेले जीव परत येणार नाहीत. प्रशासनाचे प्रतिनिधी आतापर्यंत पोहोचले नव्हते. आता टीम आणि प्रशासकीय कर्मचारी पोहोचले. त्यामुळे नंतर मदत करण्यापेक्षा पंचनामे करून घ्या, मदत पुरवा. आणि खाण्याचे आणी पिण्याची व्यवस्था करा, असे आवाहन प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.