पेण (रायगड) पेण तालुक्यातील वाशी गावात दाताचा एक बोगस डॉक्टर गेल्या 10 ते 12 वर्षांपासून लोकांची फसवणूक करत होता. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना त्याने श्री गजानन डेंटल क्लिनिक नावाने दवाखाना सुरू केला होता. मात्र ही बातमी ईटीव्ही भारतमध्ये प्रसिद्ध होताच आपल्या मागे पोलिसांची चौकशी लागू नये, म्हणून या बोगस डॉक्टरने आपल्या रुग्णालयावरचा बोर्ड बदलला आहे. आता त्याजागी श्री डेंटल केअर नावाचे नवीन बोर्ड लावण्यात आला आहे. जयेश म्हात्रे असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे.
डेंटल असोसिएशनची डॉक्टरविरोधात तक्रार
या तोतया डॉक्टरची बातमी ईटीव्ही भारतने प्रसिद्ध करताच, डेंटल असोसिएशनच्या निर्दशनास ही बाब आली. दरम्यान डेंटल असोसिएशनने याविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान आपल्या मागे पोलिसांची चौकशी लागू नये, व आपण कायदेशीर बाबींमध्ये अडकू नये, यासाठी या तोतया डॉक्टरने आपल्या दवाखान्यावरील बोर्ड बदलला आहे. आता त्याजागी श्री डेंटल केअर नावाचे नवीन बोर्ड लावण्यात आला आहे. दरम्यान जयेश म्हात्रे यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना, तो गेल्या दहा ते बारा वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत आहे. तसेच तो रुग्णांना औषध देखील देत आहे. दरम्यान त्याने आता बोर्ड बदलला आहे, मात्र हा डॉक्टर अशा पद्धतीने आणखी किती दिवस रुग्णांची फसवणूक करणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बैठीकीचा सपाटा; वाझे प्रकरणावर चर्चा?