रायगड - आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सवड मिळत नसते. 'आपण निरोगी तर आपले कुटुंब निरोगी' या धरतीवर खोपोली शहरात 2 वर्षापूर्वी सायकल इंडिया या नावाने समूह स्थापन झाला. त्यानंतर या समूहाच्या माध्यमातून खोपोली शहरासह खालापूर व कर्जत तालुक्यात सायकल चालवण्याचे फायदे पटवून देत सायकल मोठ्या प्रमाणात चालवा, अशी जनजागृती वेळोवेळी करण्यात आली. या समूहाच्या माध्यमातून 21 मार्च रोजी 100 व्या सायकल जनजागृती रॅली निमित्ताने 100 किलोमीटर अंतराचा पल्ला पार केला.
सायकल चालवा आणि निरोगी आयुष्य मिळवा -
सायकल इंडिया खोपोली या समूहाचा मुख्य उद्देश म्हणजे बहुतेक करून दैनंदिन जीवनात सायकलचाच वापर करणे. सायकल चालवल्यामुळे आपण स्वतः तंदुरुस्त राहतो तसेच पर्यावरणाचे समतोल राखण्यास सुध्दा मदत मिळेल, हा आहे. या समुहाला गेल्या दोन वर्षाच्या काळात नागरिकांकडून चांगला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अजून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन वसंत सणस व संदीप ढवळे यांनी केले.
हेही वाचा - नाशिकमध्ये महिला सावकाराची दंबंगिरी; आदिवासी दाम्पंत्यास अमानुष मारहाण