ETV Bharat / state

कोविड रुग्णाने डॉक्टरच्या डोक्यात घातला सलाईन स्टँड

दीड दोन महिन्यांपूर्वी डॉ. विक्रमजीत पडोळे, डॉ. राजीव तांबळे या डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याची घटना जिल्हा सामान्य रुग्णालयात घडल्या होत्या. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुन्हा रुग्णाकडून मारहाण झाल्याने डॉक्टरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

raigad
raigad
author img

By

Published : Jul 14, 2021, 9:33 AM IST

Updated : Jul 14, 2021, 9:44 AM IST

रायगड - अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोविड सेंटर मधील रुग्णाने रात्र पाळीला ड्युटीवर असलेल्या डॉ. स्वप्नदीप थळे यांच्या डोक्यात सलाईन स्टँड घातल्याची घटना बुधवारी घडली. यात डॉक्टर स्वप्नदीप थळे यांच्या डाव्या डोळ्याला जखम झाली आहे. मारहाण करणारा रुग्ण हा अलिबाग तालुक्यातील लोणारे गावातील आहे. त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी डॉ.विक्रमजीत पडोळे, डॉ.राजीव तांबळे या डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याची घटना जिल्हा सामान्य रुग्णालयात घडल्या होत्या. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुन्हा रुग्णाकडून मारहाण झाल्याने डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आरोपीला अटक

मारहाण करणारा रुग्ण हा अलिबाग तालुक्यातील लोणारे गावातील राहणारा आहे. गेल्या चार दिवसापासून कोरोना लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीआयू कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होता. डॉक्टर स्वप्नदीप थळे हे मंगळवारी रात्रपाळीसाठी ड्युटीवर होते. रात्री तीन साडेतीन वाजता डॉ. स्वप्नदीप थळे हे आपले काम करत होते. त्यावेळी रुग्ण पाठीमागून हातात सलाईन लावण्याचे स्टँड हातात घेऊन आला. आणि डॉक्टर स्वप्नदीप याच्या डोक्यात मारला. या मारहाणीत स्वप्नदीप हे रक्तबंबाळ झाले. आणि त्यांच्या डोळ्याला जखम झाली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई केली. डॉक्टर स्वप्नदीप यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - हिल्स स्टेशनवर होणारी गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी; पंतप्रधानांचा महाराष्ट्रातील जनतेला अप्रत्यक्ष इशारा

Last Updated : Jul 14, 2021, 9:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.