रायगड - इंधन दरवाढ विरोधात आज (सोमवारी) प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यभर आंदोलम करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातही ठिकठिकाणी इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसतर्फे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अलिबाग, कर्जत, महाड याठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर आंदोलन केले आहे. अलिबाग काँग्रेसतर्फे उसर येथील पेट्रोल पंपावर केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने इंधन दरवाढीवर कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने पेट्रोल शंभरी तर डिझेल नवदी पार झाले आहे. इंधन दरवाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. इंधन दरवाढीचा फटका हा सर्वसामान्यांना बसला आहे. आधीच कोरोना महमारीने नागरिक आर्थिक संकटात आहेत. त्यात वाढलेले पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने घरखर्च कसा चालवायचा असा सवालही यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.
हेही वाचा -मुंबईत दाखल होणार जगातील सर्वाधिक स्वस्त एसी थ्री-टायर इकोनॉमी क्लास कोच