ETV Bharat / state

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये विरोधाभास - रायगड जिल्हा परिषद निवडणूक

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. रायगड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. अलिबाग, पेण, उरण हे शेकापचे बालेकिल्ले असून येथील शिवसैनिक नेहमी शेकापच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळते. मुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यास शिवसेनेच्या एका गटात नाराजी असणार आहे.

raigad
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 2, 2020, 4:23 PM IST

रायगड - जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या(3 जानेवारी) पार पडत आहे. राज्यातील नव्या समीकरणामुळे रायगड जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता येण्याचे चित्र आहे. मात्र, शिवसेना शेकापविरोधी असल्याने शिवसेनेच्या एका गटाला सत्तेत जाण्याची इच्छा आहे. तर, दुसऱ्या गटाचा मात्र याला विरोध आहे. आपल्या भूमिकेबाबत शिवसेनेच्या दोन गटात असणाऱ्या विरोधाभासामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये भूमीकेविषयी विरोधाभास

रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप अशी आघाडी आहे. जिल्हा परिषदेत शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 11, भाजप 3 तर काँग्रेस 3 असे 59 चे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कमी सदस्य असतानाही शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्ष पद दिले होते. खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांनी अडीच वर्षे अध्यक्ष पद भूषवले आहे. यावेळी अध्यक्षपद शेकापच्या वाट्याला येणार आहे.

हेही वाचा - रायगडमधील पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणूक : शेकाप प्रथम क्रमांकावर

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. रायगड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. अलिबाग, पेण, उरण हे शेकापचे बालेकिल्ले असून येथील शिवसैनिक नेहमी शेकापच्या विरोधात असल्याचे पहायला मिळते. तर कर्जत, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर याठिकाणी शेकापची ताकद कमी आहे. शेकापही महाविकास आघाडीत सामील आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यास शिवसेनेच्या एका गटात नाराजी असणार आहे. त्यामुळे, या निवडणुकीत शेकापला सत्तेपासून दूर ठेवले जाणार की, तटकरे-पाटील पुन्हा एकत्र राहून सत्ता काबीज करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या दोन गटात विरोधाभास

3 जानेवारी रोजी होणार अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक

महाविकास आघाडी की जैसे थी परिस्थिती राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष

रायगड : रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या 3 जानेवारी रोजी पार पडत आहे. राज्यातील नव्या समिकरणामुळे रायगड जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता यावी असे चित्र असले तरी शिवसेना ही शेकपविरोधी असल्याने शिवसेनेच्या एका गटाला सत्तेत जाण्याची इच्छा असून दुसरा गटाचा विरोध आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन गटातील विरोधी भूमिकेमुळे काय निकाल लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि सदस्य याना काय आदेश देतात या त्याच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Body:
रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप अशी आघाडी आहे. जिल्हा परिषदेत शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 11, भाजप 3 तर काँग्रेस 3 असे 59 चे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कमी सदस्य असतानाही शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्ष पद दिले होते. खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांनी अडीच वर्षे अध्यक्ष पद भूषविले होते. तर यावेळी अध्यक्षपद हे शेकापच्या वाट्याला येणार आहे.Conclusion:
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरण बदलले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन होऊन राज्यात सरकार स्थापन झाले आहे. राज्यात तीन पक्ष एकत्र आले असले तरी रायगड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे. अलिबाग, पेण, उरण हे शेकापचे बालेकिल्ले असून येथील शिवसैनिक हे नेहमी शेकापच्या विरोधात असल्याने येथील तालुक्यातील परिस्थिती वेगळी आहे. तर कर्जत, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर याठिकाणी शेकापची ताकद कमी असल्याने येथील सदस्यांना शेकाप सत्तेत असल्यास कोणतीच ना नाही आहे.

महाविकास आघाडी राज्यात झाली असून शेकापही या आघाडीत सामील झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता बसल्यास शिवसेनेचा एक गट हा सत्तेपासून दूर राहणार आहे. त्यामुळे उद्या 3 जानेवारी रोजी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत कोणता चमत्कार घडून शेकापला सत्तेपासून दूर ठेवले जाणार की तटकरे पाटील पुन्हा एकत्र राहून सत्ता काबीज करणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

------------------------

बाईट : महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग मुरुड विधानसभा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.