ETV Bharat / state

कॅप्टननेच माघार घेतल्यावर चिल्ले-पिल्ले काय खेळणार? मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीका - parth pawar

सध्या महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या प्रत्येक सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर राजकीय हल्ले केले आहेत. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवार यांनाच टार्गेट केले आहे.

मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीका
author img

By

Published : Apr 23, 2019, 8:52 PM IST

Updated : Apr 24, 2019, 12:30 AM IST

रायगड - मीच ओपनिंग बॅट्समन आहे, मीच सेंचुरी मारणार आहे, त्यासाठी हेल्मेट घातले आणि माढ्याच्या पीचवर उतरले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेली गुगली पाहिली आणि शरद पवार म्हणाले, मी खेळणार नाही, जर कॅप्टनच खेळणार नाही तर चिल्ले-पिल्ले तरी काय खेळणार? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना टोला लगावला.

सध्या महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या प्रत्येक सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर राजकीय हल्ले केले आहेत. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवार यांनाच टार्गेट केले आहे.

मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीका
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आयोजित विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पनवेलच्या कामोठेतील नालंदा मैदानात ही विजयी संकल्प सभा पार पडली. आधीच्या सरकारच्या काळात आपल्या देशात कुणीही यायचे आणि टपली मारून जायचे. घुसखोर देशात हल्ले करत होते. कितीतरी नागरिकांचा बळी जायचा. तेव्हा आधीचे सरकार फक्त भाषण आणि निषेधच करायचे आणि युनोमध्ये जाऊन हे पाकिस्तान आमच्यावर हल्ले करत आहेत, एवढेच सांगायचे. सरकारकडून कोणतेच प्रतिउत्तर देत नव्हते. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून अतिरेक्यांना ठार करण्याचे आदेश देत अतिरेक्यांना सडेतोड उत्तर दिले. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकासकामांचा उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केला.

सध्या राज्यात तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुका पार पडल्या. आतापर्यंत ज्या प्रकारे मतदान झाले ते पाहून आता बारामती ही हलली आहे आणि माढा ही हलला आहे. आता मावळचा नंबर आहे. त्यामुळे मावळकरांनी काय ठरवले आहे, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला असता उपस्थितांमधून मोठ्या जल्लोषात महायुती असे उत्तर देण्यात आले. त्याप्रमाणे सर्वांनी मिळून जर ठरवले तर मागच्यापेक्षा जास्त मतांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडणूक देऊन मावळमध्ये नवा इतिहास घडवेल, असा विश्वास देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री रवीशेठ पाटील, पनवेल जिल्हा प्रमुख शिरिष घरत, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होते.
मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार स्वतः खारघरमध्ये आले आहेत. २५ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील सभा घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी पनवेलमध्ये जोरदार फिल्डिंग सुरू असताना शिवसेना-भाजपकडून आजच्या सभेत जोरदार प्रत्युत्तर देण्यात येणार हे अपेक्षित होते. त्यामुळे आता यावर शरद पवार काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:

Spo News 01

Conclusion:
Last Updated : Apr 24, 2019, 12:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.