ETV Bharat / state

पूरग्रस्त भागात मुस्लिम बांधवांकडून गाव आणि मंदिराची स्वच्छता - मौलाना हाकीम काळोखे

मुस्लिम संघटनेतर्फे दहा लाखाची आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तू तसेच औषधोपचार यांची मदत केली. यावेळी मिरज येथील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या गावाची आणि मंदिराची स्वच्छता करून धार्मिक एकोप्याचा संदेश दिला आहे.

पूरग्रस्त भागात मुस्लिम बांधवांकडून गाव आणि मंदिराची स्वच्छता
author img

By

Published : Aug 20, 2019, 6:26 PM IST

रायगड - पूरग्रस्त मिरज भागात मुस्लिम बांधवांकडून गावाची आणि मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे. महापूरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्हयात अनेक गावे पाण्याखाली गेली होती. जाती पातीच्या भिंती ओलांडून पूरग्रस्तांसाठी सर्व स्तरीतून मदतीचा ओघ सुरू झाला. रायगड जिल्ह्यातील जमियेते उलमा हिंद श्रीवर्धन मुस्लिम संघटनेतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे. मुस्लिम संघटनेतर्फे दहा लाखाची आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तू तसेच औषधोपचार यांची मदत केली. यावेळी मिरज येथील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या गावाची आणि मंदिराची स्वच्छता करून धार्मिक एकोप्याचा संदेश दिला आहे.

पूरग्रस्त भागात मुस्लिम बांधवांकडून गाव आणि मंदिराची स्वच्छता

अतिवृष्टीने सांगली, कोल्हापूर, मिरज जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. पुरामुळे येछील जनजीवन उध्वस्त झाले. अनेकांचे संसार बुडाले, जनावरे वाहून गेली, काही जण मृत्युमुखी पडले. कोल्हापूर सांगली मधील पूरस्थिती निवळल्यानंतर या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घरांमध्ये चिखल, माती साचली आहे. मंदिरे आणि गावातही मोठ्या प्रमाणात चिखल, कुजलेले धान्य पसरले होते. मुस्लिम बांधवांनी गावातील व मंदिरातील कचरा, चिखल काढून स्वच्छता केली.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील मुस्लिम बांधव कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्त भागात मदत वाटप करीत असताना, मिरज मधील एका गावात मंदिराची पुरामुळे दुर्दशा झाली होती. मंदिराच्या परिसरात चिखल साचला होता. अशा वेळी मुस्लिम बांधवांनी जाती पातीचा भेद बाजूला सारून मंदीरात साचलेला चिखल काढून मंदिर स्वच्छ केले. त्याचप्रमाणे गावातही स्वच्छता केली.

जमियते उलमा हिंद व अंजुम ने दर्दमंदान म्हसळा- श्रीवर्धन विभाग तसेच श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील अनेक मुस्लिम जमातीने संघटित होऊन दहा लाखची रक्कम जमा केली गेली. या मुस्लिम संघटनांनी कोल्हापूर-सांगली, मिरजला जाऊन पूरग्रस्तांसाठी अन्न धान्य व कपड्याचे वाटप केले. तर काही पूरग्रस्तांना आर्थिक मदत व तेथील नागरिकांची डॉक्टरांकडून तपासणीही केली.

नैसर्गिक आपत्तीमुळे जाती पातीच्या भिंती नष्ट होऊन प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला आहे. मंदिराची स्वच्छता करून मुस्लिम बांधवांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. जमियेते उलमा हिंद संघटनेचे उपाध्यक्ष मौलाना अमनुल्लाह बुरूड, जमियेते उलमा हिंद श्रीवर्धन विभागाचे तालुका अध्यक्ष काजी मोहम्मद हुसेन माहीमकर, मुफ्ती म्हामूद मोमीन, मौलाना मलिक कोतवाल, मौलाना रिहान करदमे, मौलाना हाकीम काळोखे, रिजवान चिविलकर यांनी पुढाकार घेऊन हे कार्य पूर्ण केले.

Intro:मुस्लिम बांधवांनी स्वच्छ केली मंदिर व गाव

कोल्हापूर, सांगली, मिरज पूरग्रस्त भागात मुस्लिम संघटनेकडून मदत

रायगड : नैसर्गिक अपत्तीने सांगली, कोल्हापूर जिल्हयात हाहाकार उडाला. या नैसर्गिक आपत्तीने जाती पातीची असलेली रेषाही तुटून सर्व समाजामधून मदतीचा ओघ सुरू झाला. रायगड जिल्ह्यातील जमियेते उलमा हिंद श्रीवर्धन मुस्लिम संघटनेतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात सरसावला आहे. मुस्लिम संघटनेतर्फे दहा लाखाची आर्थिक मदत गोळा करून आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तू तसेच औषधोपचार याची मदत केली आहे. मिरज येथील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या गावातील मंदिर व गावाची स्वच्छ करून एकतेचा संदेश दिला आहे.

अतिवृष्टीने सांगली, कोल्हापूर, मिरज जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे येथील जनजीवन उध्वस्त झाले. अनेकांचे संसार बुडाले, जनावरे वाहून गेली, काही जण मृत्युमुखी पडले. कोल्हापूर सांगली मधील पूरस्थिती निवळल्यानंतर या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाली. जनतेच्या घरात चिखल माती साचली तशी मंदिर व गावातही मोठ्या प्रमाणात चिखल, कुजलेले धान्य पसरले होते. मुस्लिम बांधवांनी गावातील व मंदिरातील कचरा, चिखल काढून स्वच्छता केली.Body:रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील मुस्लिम बांधव कोल्हापूर, सांगली, मिरज भागात मदत घेऊन पोहचले. पूरग्रस्त भागात मदत वाटप करीत असता मिरज मधील एका गावात मंदिराची पुरामुळे दुर्दशा झाली असून देवळात व परिसरात चिखल साचला होता. अशा वेळी मुस्लिम बांधवांनी जाती पातीचा भेद बाजूला सारून मंदीरात साचलेला चिखल काढून टाकून मंदिरे स्वच्छ केली. तर गावातील स्वच्छताही केली.

पुरामुळे येथील जनतेचे संसार उघड्यावर आले असून खाण्यापिण्याचे हाल आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केले आहेत. जमियेते उलमा हिंद व अंजुम ने दर्दमंदान म्हसळा- श्रीवर्धन विभाग, तसेच श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील अनेक मुस्लिम जमातीने संघटित होऊन दहा लाखची रक्कम जमा केली गेली. जमियेते उलमा हिंद श्रीवर्धनमधील मुस्लिम संघटनेने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे आले. कोल्हापूर-सांगली, मिरज अशा ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांसाठी टेम्पोद्वारे मोठ्या प्रमाणावर अन्न धान्य व कपड्याचे वाटप करण्यात आले. तर काही पूरग्रस्तांना आर्थिक मदत व तेथील नागरिकांची डॉक्टरांकडून तपासणीही केली.Conclusion:नैसर्गिक आपत्तीमुळे जाती पाती भेदभाव नष्ट होऊन प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला आहे. मंदिराची स्वच्छता करून मुस्लिम बांधवांनी एक समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. जमियेते उलमा हिंद संघटनेचे उपाध्यक्ष मौलाना अमनुल्लाह बुरूड, जमियेते उलमा हिंद श्रीवर्धन विभागाचे तालुका अध्यक्ष काजी मोहम्मद हुसेन माहीमकर, मुफ्ती म्हामूद मोमीन, मौलाना मलिक कोतवाल, मौलाना रिहान करदमे, मौलाना हाकीम काळोखे, रिजवान चिविलकर यांनी पुढाकार घेऊन हे कार्य पूर्ण केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.