ETV Bharat / state

रसायन घेऊन जाणारा ट्रक कर्नाळा खिंडीत उलटला; जीवितहानी नाही

टँकर रसायन कॅप्सूल घेऊन मुंबईकडे जात होता. कर्नाळा घाटाजवळ येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला

रसायन घेऊन जाणारा ट्रक कर्नाळा खिंडीत उलटला
author img

By

Published : Jun 25, 2019, 12:25 PM IST

रायगड - मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत रसायन घेऊन जाणारा टँकर उलटून अपघात झाला आहे. या टँकरमधून रसायन रस्त्यावर पडले असून ते नष्ट करण्याचे काम सुरू आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

टँकर रसायन कॅप्सूल घेऊन मुंबईकडे जात होता. कर्नाळा घाटाजवळ येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला. त्यामुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही. मात्र, टँकरमधून रसायन बाहेर पडले आहे.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाकडून रस्त्यावर सांडलेले रसायन नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून वाहतूक सुरळीत सुरू आहे.

Intro:कर्नाळा खिंडीत रसायन घेऊन जाणारा टँकर पलटी होऊन अपघात

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत रसायन घेऊन जाणारा टँकर पलटी होऊन अपघात झाला आहे. या टँकर मधून रसायन रस्त्यावर पडले असून ते नष्ट करण्याचे काम अग्निशमन दल व पोलीस करीत आहेत.Body:रसायन कॅप्सूल घेऊन जाणारा टँकर मुंबईकडे जात असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चालकाचा वाहनवरील तोल सुटून टँकर पलटी झाला. टँकर हा रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याने वाहतुकीस कोणताही अडथळा नाही आहे. मात्र कॅप्सूल मधून रसायन बाहेर पडले आहे.Conclusion:या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. रस्त्यावर सांडलेले रसायन नष्ट करण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. वाहतूक सुरळीत सुरू आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.