ETV Bharat / state

मतदानावर पावसाचे सावट, रायगडमध्ये 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

author img

By

Published : Oct 20, 2019, 11:44 PM IST

राज्यात सोमवारी विधानसभा निवडणुका होत आहे. मात्र, जिल्ह्यात प्रादेशिक हवामान खात्याने पुढील 24 तासांत समुद्रकिनारपट्टीवर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मतदानावर पावसाचे सावट

रायगड - प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील 24 तासांत समुद्रकिनारपट्टीवर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना मासेमारीला जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आल्याने उद्या (सोमवार) मतदानावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मतदानावर पावसाचे सावट

ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी पाऊस अद्यापही जाण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांना आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने केले आहे.

हेही वाचा - जिल्ह्यातील 22 लाख 66 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; प्रशासन सज्ज

21 ऑक्टोबर रोजी राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी प्रशासनाने ईव्हीएम मशीन आणि साहित्य मतदान केंद्रावर पोहचविले आहे. मात्र, पावसाचा व्यत्यय निर्माण झाला असल्याने मतदार मतदानाला बाहेर पडतील की नाही, याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असून मतदानावर पावसाचा परिणाम पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - प्लास्टिकमुक्त पालिका मुख्यालय करण्यासाठी पनवेल महापालिकेत अनोखी मोहीम

Intro:जिल्ह्यात 24 तासात अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिला इशारा

मतदानावर पावसाचे सावट

रायगड : प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील 24 तासांत समुद्रकिनारपट्टीवर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमाराना मासेमारीला जाण्यास बंदी घातलेली आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्याने उद्या (21 रोजी) मतदानही असल्याने पावसाचा परिणाम मतदानावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी पाऊस अद्यापही जाण्याचे नाव घेत नाही. सकाळ पासून पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने मच्छीमाराना, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

.Body:21 ऑक्टोबर रोजी राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी प्रशासनाने ईव्हीएम मशीन आणि साहित्य मतदान केंद्रावर पोहचविले आहे. मात्र पावसाचा व्यत्यय निर्माण झाला असल्याने मतदार मतदानाला बाहेर पडतील की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसामुळे मतदानावर परिणाम पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.Conclusion:अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. असा इशारा देण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यावरील सखल भागातील नागरिकांना व मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या तहसीलदार कार्यालय व पोलीस स्टेशन ला सम्पर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने दिला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.