ETV Bharat / state

रायगडमध्ये तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल

हसाळा येथे तिहेरी तलाक विरोधी तक्रार नोंद झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडितेने युवका विरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून साजीद इनामदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author img

By

Published : Nov 17, 2019, 7:51 PM IST

प्रातिनिधीक छायाचित्र

रायगड - म्हसाळा येथे तिहेरी तलाक विरोधी तक्रार नोंद झाल्याची घटना समोर आली आहे. येथील एका युवकाने दुसरा विवाह करण्यासाठी तोंडी तीनवेळा तलाक म्हणत पत्नी आणि दोन मुलांना सोडून दिले.

म्हसळा शहरातील साजीद सगीर इनामदार या तरुणाने २५ ऑक्टोंबर २०१३ ला पीडितेशी लग्न केले होते. मात्र, म्हसळा शहरात राहणाऱ्या साजीद इनामदार याचा दुबई येथे व्यवसाय असून तो म्हसळ्यामध्ये ये-जा करत असल्याने त्याचा एका दुसऱ्या तरुणीशी प्रेमसबंध जुळले. प्रेम संबध जुळलेल्या या तरुणीसोबत लग्न करण्यासाठी इनामदार याने ३१ ऑक्टोंबर २०१९ला आपल्या पत्नीला तोंडी तीनवेळा तलाक बोलून दोन चिमुकल्या मुलांसह सोडून दिल्याचा प्रकार घडला. साजीद इनामदारने आज (रविवार) सकाळी साडेअकरा वाजता दुसरा विवाह केला. आरोपी साजीद इनामदारला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे म्हसळा शहर अध्यक्ष रियाज घराडे यांनी केली आहे.

याबाबत 26 वर्षीय पीडितेने म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी साजीद सगीर इनामदार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - पनवेलचे महापौरपद खुल्या गटातील महिलेकडे; कोणाला मिळणार मान?

Intro:मोदी सरकारने बंदी घालून कायदयात रूपांतर केलेल्या ट्रिपल तलाक विरोधी तक्रार म्हसळ्यामध्ये समोर आली असुन शहरात राहणाऱ्या एका युवकाने दुसरे विवाह करण्यासाठी आपल्या पत्नीसहीत दोन मुलांना तोंडी तलाक..तलाक...तलाक बोलून सोडून दिल्याची धक्कादायक घटना म्हसळा शहरात घडली आहे.
Body:म्हसळा शहरातील साजीद शगीर इनामदार या तरुनाने २५ ऑक्टोंबर २०१३ रोजी शरीफा मोहम्मद हनिफ शेख या तरुनीशी लग्न केले होते. मात्र म्हसळा शहरात राहण्याऱ्या साजीद इनामदार याचा परदेशातील डुबई येथे व्यवसाय असुन तो म्हसळ्यामध्ये ये जा करत असल्याने त्याचा इतर कोणत्यातरी तरुणीशी प्रेमसबंध जुळले. प्रेम संबध जुळलेल्या या तरुणी सोबत लग्न करण्यासाठी इनामदार याने ३१ ऑक्टोंबर २०१९ रोजी आपल्या पाहिल्या पत्नीला तोंडी तलाक!तलाक!!तलाक!!! बोलून जसा साजीद इनामदार ( वय ५ वर्षे ) व मुसा साजीद इनामदार (वय ४ वर्षे ) या चिमुकल्या मुलांसोबत एकटे सोडून दिल्याचा प्रकार घडला आहे. इनामदार आपले दुसरे विवाह रवीवारी सकाळी ११ : ३० वाजता करणार होता, अथवा झाले ही असेल. मात्र शरीफा साजीद इनामदार हिच्या सोबत त्याचे पहिले लग्न झाले होते त्याचा त्याला विसर झाला आहे. एका मुलीचे आयुष्य वेशीवर टांगणाऱ्या आरोपी इनामदार याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे म्हसळा शहर अध्यक्ष रियाज घराडे यांनी केली आहे.
Conclusion:याबाबत फिर्यादी तथा पिडीत शरीफा साजीद इनामदार वय _ २६ वर्ष या तरुनीने म्हसळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी साजीद शगीर इनामदार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोबत-ट्रिपल तलाक पिडीत शरीफा साजीद इनामदार हिचा साजीद इनामदार सोबत लग्नाचा फोटो व सोबत त्यांच्या मुलांचा फोटो
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.