ETV Bharat / state

सायन-पनवेल महामार्गावर बर्निंग बसचा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी - Panvel

सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीतील नावडे फाट्याजवळ एका खासगी बसने पेट घेतल्याची घटना घटली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

सायन-पनवेल महामार्गावर आगीत भस्मसात झालेली बस
author img

By

Published : Apr 26, 2019, 9:11 PM IST

रायगड - सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीतील नावडे फाट्याजवळ एका खासगी बसने पेट घेतला. बसच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने गाडी थांबवली होती. पण तोपर्यंत गाडीने पेट घेतला होता. दरम्यान, बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आले.

सायन पनवेल महामार्गावर आगीत भस्मसात झालेली बस

वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवासी आणि चालक थोडक्यात बचावले. गॅलिक्सी कंपनीची ही बस असल्याचे समजते आहे. मुंबईतील वांद्रे येथून ही बस तळोजा एमआयडीसीमध्ये असलेल्या गॅलिक्सी कंपनीचे कर्मचारी घेऊन जात होती. वाढत्या उन्हामुळे बसचे इंजिन तापल्याने शॉर्टसर्किट झाले आणि काही क्षणातच बसने पेट घेतला.

आग इतकी भीषण होती की आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाची अशरक्ष: राख झाली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान या आगीमुळे काहीकाळासाठी बसमधील प्रवाशांसोबत परिसरातील नागरिकांमधेही खळबळ उडाली.

Intro:बातमीला व्हिडीओ सोबत जोडला आहे.

पनवेल

सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीती नावडे फाट्याजवळ एका खाजगी बसने पेट घेतला. बसच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने गाडी थांबवली. पण तोपर्यंत गाडीने पेट घेतला होता. दरम्यान, बसमधील प्रवाशांना तातडीने उतरवण्यात आलं. त्यामुळे बसमधील प्रवासी आणि चालक थोडक्यात बचावले. Body:GALAXY कंपनीची ही बस होती. मुंबईतील बांद्रा इथून ही बस तळोजा एमआयडीसीमध्ये असलेल्या Galaxy कंपनीचे कर्मचारी घेऊन जात होती. वाढत्या उन्हामुळे बसचे इंजिन तापल्याने शॉर्टसर्किट झाला आणि बघता बघता पुढच्या काही क्षणांतच बसने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती बस या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.Conclusion:यात प्रवाशांचं सामानही जळून खाक झालं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. यावेळी नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.