रायगड - उरण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेले भाजपचे महेश बालदी यांना अखेर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हकालपट्टी केली आहे. मात्र, ही हकालपट्टी करताना त्याच्यासोबत असलेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर कारवाई केलेली नाही.
हेही वाचा- 'भाजप-सेनेचे राजकारण जाती-धर्माच्या नावाने जनतेत दुफळी निर्माण करणारे'
उरण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असून शिवसेनेचे मनोहर भोईर हे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेकडून पुन्हा मनोहर भोईर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. महेश बालदी हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक असून जेएनपीटीचे विश्वस्त आहेत. उरण विधानसभा मतदारसंघासाठी महेश बालदी हे सुद्धा इच्छुक होते.
युतीमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर यांना उमेदवारी देण्यात आली. महेश बालदी यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे युतीत आघाडी निर्माण झाली. भाजपच्या पक्ष नेतृत्वाने सांगूनही बालदी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे मनोहर भोईर यांच्या अडचणी वाढल्या होत्या, असे असूनही भाजपकडून बालदी यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती.