ETV Bharat / state

गड्या आता थांबायचं नाही... पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपच्या बैठका सुरू

निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने मास्टर प्लान आखायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघ
author img

By

Published : Sep 29, 2019, 5:07 PM IST

रायगड - अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आजी माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

गड्या आता थांबायचं नाही... पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपच्या बैठका सुरू

हेही वाचा... श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ : काका-पुतण्यांच्या अस्मितेच्या लढाईत कोण मारणार बाजी ?

पनवेल हा शेतकरी कामगार पक्षाचा गड समजला जात असे. मात्र गेल्या दीड दशकांचा विचार केला, तर इथे शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मिश्र लोकवस्तीचे ठिकाण म्हणून पनवेलकडे पाहिले जाते. हा शहरीबहुल परिसर अनुक्रमे काँग्रेस आणि भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे. शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी 2009 आणि 2014 साली या मतदारसंघात झुंज दिली. एकंदरीत मागील दोनही निवडणुकीत ठाकूर विरुध्द पाटील अशी चुरशीची लढत पनवेलकरांना अनुभवायला मिळाली आहे. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत शेकापच्या उमेदवारावर अद्याप शिक्कामोर्तब झाला नसला, तरी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये तयारीला सुरवात केली आहे.

हेही वाचा... लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ : भाजपची विजयी घोडदौड विरोधक रोखणार का ?​​​​​​​

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर भाजपने रायगड जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. तसेच त्यांच्याकडे राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ असलेल्या सिडकोच्या अध्यक्षपदाचीही सूत्रे आहेत. दुसरीकडे पनवेल महापालिकेवरही भाजपची एक हाती सत्ता आहे.

गड्या आता थांबायचं नाही...

गेल्या अनेक वर्षांपासून पनवेलवर वर्चस्व निर्माण करणारे आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर, हे कार्यकर्त्यांना 'आता नाही तर कधीच नाही', या भावनेने कामाला लागायला सांगत आहेत.

Intro:सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे

पनवेल

काही दिवसांवर विधानसभा निवडणुक येऊन ठेपलीये. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपने मास्टर प्लॅन आखायला सुरु वात केलीये. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमधील आजी माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकी घेण्यास सुरुवात केलीये.
Body:पनवेल हा शेतकरी कामगार पक्षाचा गड समजला जात असे. मात्र गेल्या दीड दशकांचा विचार केला तर इथे शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मिश्र लोकवस्ती म्हणून पनवेलकडे पाहिले जाते. हा शहरी बहुल परिसर अनुक्रमे काँग्रेस आणि भाजपच्या पाठीशी उभा राहिला. गेल्या दहा वर्षापासून आमदार प्रशांत ठाकूर या मतदारसंघाचे विधानसभेत नेतृत्व करीत आहेत. शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी 2009 आणि 2014 साली या मतदारसंघात झुंज दिली. एकंदरीत मागील दोनही निवडणुकीत ठाकूर विरुध्द पाटील अशी चुरशीची लढत पनवेलकरांना अनुभवायला मिळाली. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत शेकापच्या उमेदवारावर अद्याप शिक्कामोर्तब झाला नसला तरी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये जोरदार तयारीला सुरवात केलीये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या गुडबुकात जागा मिळवलेले आ. प्रशांत ठाकूर यांच्यावर भाजपने रायगड जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहेच. तसेच त्यांच्याकडे राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ असलेल्या सिडकोच्या अध्यक्षपदाची सूत्रे आहेत. दुसरीकडे पनवेल महापालिकेवरही भाजपची एक हाती सत्ता आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि विकासकामांच्या माध्यमातून संपर्क वाढविला जातोय.

Conclusion:आता थांबायचे नाही रे गड्या
गेल्या अनेक वर्षांपासून पनवेलवर वर्चस्व निर्माण करणारे आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर हे आता नाही तर कधीच नाही, या भावनेने कामाला लागले आहेत. प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्र करून रिचार्ज करीत आहेत. आता थांबायचे नाही रे, गड्या थांबायचे नाही, असा संदेश इच्छुक कार्यकर्त्यांना देत असल्यामुळे कार्यकर्तेही आपल्या नेत्याला विधानसभेत पाठविण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यामुळे चुरस वाढणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.