ETV Bharat / state

Charulata Tokas Criticizes BJP : भाजपा सामाजिक वातावरण दूषित करून स्वतःचे राजकीय हित साधतेय - Raigad

भारतीय जनता पक्ष समाजात तेढ निर्माण करून (BJP Creating Rift In Society) राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस (INC State VP Charulata Tokas) यांनी केला. पेण शहर काँग्रेस (Pen City Congress) कार्यालयाचे टोकस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

Pen City Congress
काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय पेण
author img

By

Published : Dec 10, 2021, 2:17 PM IST

पेण (रायगड)- राष्ट्रीय काँग्रेसचे पेण शहराध्यक्ष प्रवीण पाटील (Pravin Patil) यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयाचे (Congress Central Office) उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस (INC State VP Charulata Tokas) व जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत (Mahendra Gharat) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब नेने, रायगड जिल्हा सहप्रभारी श्रीरंग बरगे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, तालुका अध्यक्ष अशोक मोकल, पेण शहर काँग्रेस अध्यक्ष प्रवीण पाटील, हिदायतुल्ला कुवारे, प्रकाश मोकल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोडा आणि राज्य करा हीच भाजपची नीती

भारतीय जनता पक्ष समाजात तेढ निर्माण करून राजकारण करत आहे. इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून भाजपा सामाजिक वातावरण दूषित करून, स्वतःचे राजकीय हीत साधत असल्याचा आरोप प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या की, भाजपने निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेले कोणतेही वचन पाळले नाही. सुज्ञ मतदार राजाला भाजपची कुटनीती लक्षात आली असून, सामाजिक स्वास्थ व देशाच्या खऱ्या अर्थाने प्रगतीकरिता आगामी निवडणुकांमध्ये सामान्य नागरिक काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणुकीतील यश- अपयश हे तात्पुरते असते. परंतु काँग्रेस ही एक विचारधारा आहे व ती जिवंत ठेवण्याचे काम प्रवीण पाटील यांच्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी निष्ठेने केले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

सच्चा कार्यकर्ता आजही काँग्रेसच्याच सोबत
जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले की, काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आजही काँग्रेसच्याच सोबत आहे. काँग्रेससाठी लवकरच पुन्हा सुगीचे दिवस येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागळातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडण्याकरिता कामाला लागावे असा आदेशही त्यांनी यावेळी दिला. काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांचा जनसंपर्क दांडगा असून, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला त्याचा निश्चितच लाभ होणार असल्याचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले. उद्घाटन प्रसंगी आर्मी चीफ सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.