रायगड - निसर्ग चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर येत आहे. यासाठी विविध नेत्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा केला आहे. आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात रायगडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. माध्यमांशी बोलताना, 'मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे प्रशासन अडकून पडणं हे जरी खरं असलं, तरी लोकांच्या भावना जाणून घेणं गरजेचं आहे,' असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक खात्याचे मंत्री आपापल्या खात्याशी संबंधित नुकसानीचा आढावा घेत असल्याची माहिती थोरात यांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल परिसरात थोरात यांनी नुकसानाची पाहणी केली. एका पक्षाचं सरकार असलं तरी कुरबुरी असतात. हे तर तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळं थोड्याफार कुरबुरी असणारच, असे ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी सोमवारची वेळ दिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात रायगडच्या दौऱ्यावर आहेत. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे रायगडच्या दौऱ्यावर आहेत. अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल परिसरात त्यांनी नुकसानाची पाहणी केली. तसेच वादळग्रस्तांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी काही वादळग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष माणिक जगताप उपस्थित होते. सतर्कतेमुळे जीवितहानी टळली; मात्र नुकसान खूप मोठं असल्याचे ते म्हणाले. पूर्वीच्या तुलनेत दुपटीहून अधिक मदत दिली असून 100 कोटींचा निधी आधीच खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात नुकसानग्रस्तांना आणखी मदत देण्याचे आश्वासन देत, सरकार जनतेच्या पाठीशी भक्कम उभे असल्याचा विश्वास महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल परिसरात थोरात यांनी नुकसानाची पाहणी केली.