ETV Bharat / state

पनवेल महापालिकेच्या सुपरवायझरवर कामगांराचा चाकू हल्ला - कंत्राटी सुपरवायझर

दिनेश राठोड, असे या कंत्राटी सुपरवायझरचे नाव आहे. दिनेश राठोड हा खारघरमधल्या कोपरा परिसरात राहत असून तो साई गणेश एंटरप्राइजेससाठी काम करतो.

सुपरवायझरवर कामगांराचा चाकूने हल्ला
author img

By

Published : Sep 28, 2019, 6:53 PM IST

रायगड - महापालिकेच्या एका कंत्राटी सुपरवायझर सफाई कामगारांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सुपरवायझर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेमुळे पनवेल महापालिकेच्या कामगारांवरील हल्ल्याच्या घटनेने पुन्हा डोक वर काढले आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना कोणी वाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुपरवायझरवर कामगांराचा चाकूने हल्ला

दिनेश राठोड, असे या कंत्राटी सुपरवायझरचे नाव आहे. दिनेश राठोड हा खारघरमधल्या कोपरा परिसरात राहत असून तो साई गणेश एंटरप्राइजेससाठी काम करतो. रवी गुंजाळ आणि सिद्धार्थ गायकवाड हे दोघेही दिनेश राठोडकडे सफाई कामगार म्हणून काम करत होते. सकाळच्या सुमारास दिनेश राठोड हा खारघरमधल्या कोपरा परिसरातून जात असताना अचानक या दोन्ही सफाई कामगारांनी दिनेशवर चाकूने 3 वेळा वार केले आणि पळून गेले.

हेही वाचा - रायगडातील नर्सिंग महाविद्यालयाचे काम सहा वर्षानंतरही अपूर्णच; कोट्यवधीचा निधी खर्च

दरम्यान, जखमी अवस्थेत राठोड याने त्या ठिकाणाहून पळ काढला आणि या घटनेची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, खारघर पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पुढील कायदेशीर कारवाई केली.

हेही वाचा - अलिबाग मतदार संघात 4 नवीन मतदान केंद्र: 375 मतदान केंद्रांवर होणार मतदान

गेल्या काही महिन्यात पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले वाढताना दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत पीडित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कुणी पाठीशी ही येत नसल्याने महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे. त्यामुळे पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांना कुणी वाली आहे का? असा सवाल येथील कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.

Intro:पनवेल

सोबत बाईट आणि व्हिज्युअल जोडले आहेत

पनवेल महापालिकेच्या एका कंत्राटी सुपरवायझरवर सफाई कामगारांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीये. यात सुपरवायझर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु या घटनेने पनवेल महापालिकेच्या कामगारांवरील हल्ल्याच्या घटनेने पुन्हा डोकं वर काढल्यानं महापालिका कर्मचाऱ्यांना कोणी वाली आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय.

दिनेश राठोड असं या कंत्राटी सुपरवायझरचं नाव आहे. दिनेश राठोड हा खारघरमधल्या कोपरा परिसरात राहत असून तो साई गणेश एंटरप्राइजेससाठी काम करत होता. रवी गुंजाळ आणि सिद्धार्थ गायकवाड हे दोघेही कंत्राटी सुपरवायझर दिनेश राठोडकडे सफाई कामगार म्हणून काम करत होते. सकाळच्या सुमारास कंत्राटी सुपरवायझर दिनेश राठोड हा खारघरमधल्या कोपरा परिसरातुन जात असताना अचानक हे दोन्ही सफाई कामगारांनी त्याला गाठलं आणि एका विषयावर बाचाबाची करू लागले. त्यांच्यातील शाब्दिक चकमकीत इतक्या वाढल्या की त्याचं रूपांतर हल्ल्यात झालं. या दोन्ही सफाई कामगारांनी कंत्राटी सुपरवायझर दिनेश राठोड यांच्यावर चाकूने तीन वेळा वार केले आणि तिथून पळून गेले. त्यानंतर आपल्याला कोणी बघू नये म्हणून कोपरा गावातल्याच एका घरामध्ये लपून बसले.

Body:दरम्यान, जखमी अवस्थेत राठोड याने त्या ठिकाणाहून पळ काढला आणि या घटनेची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, खारघर पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पुढील कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे.

Conclusion:गेल्या काही महिन्यात पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले वाढताना दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत पीडित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कुणी पाठीशी ही येत नसल्याने महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचत आहेत. त्यामुळे पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांना कुणी वाली आहे का, असा सवाल इथला कर्मचारी वर्ग करताना दिसून येतोय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.