ETV Bharat / state

2021 मध्ये रायगडचा विकास साध्य करणार; पालकमंत्र्यासह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा संकल्प - रायगड विकासाचा संकल्प

नव वर्षात रायगड जिल्ह्याचा परीपूर्ण विकास करण्याचा मानस लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय कॉलेज बॅच, बोट अंबुलन्स, पर्यटन रोजगार वाढीसाठी प्रयत्न, जिल्ह्याच्या विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्यासह जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणी शुद्ध पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

2021 मध्ये रायगडचा विकास साध्य करणार;
2021 मध्ये रायगडचा विकास साध्य करणार;
author img

By

Published : Jan 1, 2021, 1:34 PM IST

रायगड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने 2020 या सरत्या वर्षाला निरोप देत 2021 या नवीन वर्षाचे स्वागत केले. नवीन वर्ष सुरू झाले की प्रत्येकजण नवीन संकल्प करतात. असेच रायगडच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपले संकल्प केले आहेत. केलेले संकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, राजीपचे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शासकीय वैद्यकीय कॉलेज बॅच, बोट अंबुलन्स, पर्यटन रोजगार वाढीसाठी प्रयत्न - अदिती तटकरे

नवीन वर्ष हे नेहमी नवीन ऊर्जा घेऊन येत असते. मागच्या वर्षी राहिलेले संकल्प नवीन वर्षात तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहे. मुख्य संकल्प म्हणजे जिल्ह्यात अलिबाग येथे सुरू होत असलेल्या शासकीय वैद्यकीय कॉलेजची विद्यार्थ्यांची पहिली बँच जूनमध्ये सुरू करण्याचा मानस आहे. यासाठी केंद्राकडे प्रस्तावही सादर केलेला आहे. रायगड जिल्ह्यातील अतिदक्षता रुग्णाला मुंबईत त्वरित उपचार मिळावे यासाठी बोट अंबुलन्स सुविधा सुरू करणासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्ह्यातील पर्यटन वाढीबरोबर त्यातून रोजगार निर्मिती करण्याचा महत्वाचा मानस असल्याचा संकल्प असल्याचे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

जिल्ह्याच्या विकासाचे प्रकल्प करणार पूर्ण - जिल्हाधिकारी निधी चौधरी

रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन हे नेहमीच अग्रेसर राहिले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात सोलर सिस्टम बसवून घेणार आहोत. जेणेकरून वीज बचत होणार आहे. जिल्ह्यातून शासकीय कार्यालयात येणाऱ्या दिव्यांगाना कार्यालय चढताना त्रास होत असतो. यासाठी आधी जिल्हाधिकारी कार्यालयात रॅम्प तसेच लिफ्ट सुविधा केली जाणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, आदिवासी समाजाचा विकास यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच जिल्ह्यात येत असलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणी शुद्ध पाणी देणार - मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीप

रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला 55 लिटर शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्याचा संकल्प केला आहे. तसेच जिल्हा कचरामुक्त, प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. असा संकल्प 2021 साठी केल्याचे राजीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आरोग्य यंत्रणा सक्षम करणार - डॉ सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक

2021 मध्ये रायगडचा विकास साध्य करणार;
2021 मध्ये रायगडचा विकास साध्य करणार;
कोरोना महामारीमुळे आरोग्य यंत्रणे वर मोठा ताण पडला आहे. असे असले तरी आरोग्य यंत्रणा या महामारीत डगमगली नाही. कोरोना सारखी महामारी जिल्ह्यात आटोक्यात आणण्यात शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मात्र भविष्यात अशा संकटांना तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासनाच्या मदतीने ती सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच शासकीय रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. शासकीय डॉक्टरांना पगार कमी मिळत असल्याने याठिकाणी डॉक्टर येण्यास धजावत नाहीत. यासाठीही शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.