ETV Bharat / state

उरणमधील जेएनपीटी बंदरातर्गत असणाऱ्या चौथ्या बंदराविरोधात आंदोलन

जातीभेद करत स्थानिकांवर अन्याय आणि परप्रांतीय तमिळ लोकांना नोकरी देत असल्याचा ठपका ठेवत सिंगापूर पोर्ट प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले.

author img

By

Published : Jan 20, 2021, 5:50 PM IST

agitation
सिंगापूर पोर्ट प्रशासनाविरोधात आंदोलन

रायगड - जातीभेद करत स्थानिकांवर अन्याय आणि परप्रांतीय तमिळ लोकांना नोकरी देत असल्याचा ठपका ठेवत सिंगापूर पोर्ट प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते महेंद्र घरत यांनी केले. तर कामावरून काढण्यात आलेल्या स्थानिक नोकरदारांना तात्काळ नोकरीवर घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सिंगापूर पोर्ट प्रशासनाविरोधात आंदोलन

बंदर व्यवस्थापक शिवा कुमार यांच्या पुतळ्याचे केले दहन

जेएनपीटी बंदराअंतर्गत सुरू असणाऱ्या चौथ्या बंदरामध्ये जातीभेद होत असल्याचा ठपका ठेवत बंदराविरोधात आंदोलन करण्यात आले. चौथे म्हणजेच सिंगापूर पोर्टमध्ये स्थानी नोकरदारांवर अन्याय केला जात असून येथील सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, तसेच अन्य स्थानीक नोकरदार यांच्या जागेवर तामिळ भाषिकांची भरती केली जात असून, स्थानिकांना नोकरिपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचं म्हणत हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान बंदर व्यवस्थापक शिवा कुमार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी कामगार नेते महेंद्र घरत यांनी बंदर प्रशासनाचा खरपूस समाचार घेत येथील कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घ्या अन्यथा बंदर चालू देणार नाही असा इशारा दिला आहे.

स्थानिकांवरील अन्यायाविरोधात सामान्य नागरिक रस्त्यावर उतरणार

जेएनपीटी बंदर सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्यात अडकलेले असताना, जेएनपीटी बंदराअंतर्गत सुरू असणाऱ्या चौथ्या बंदरालाही आंदोलनाच्या झळा पोहचू लागल्या आहेत. स्थानिकांना डावलून परप्रांतीय नोकरभरती करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. तर याविरोधात आता सामान्य नागरिकही रस्त्यावर उतरण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.