ETV Bharat / state

आमदारकीच्या पहिल्याच संधीत अदिती तटकरेंना मंत्रिपद, सेना आमदारांची आशा मावळली - रायगड जिल्हा परिषद

पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या अदिती तटकरे यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे. मात्र, यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांच्या आशा मावळल्या आहेत.

आमदार अदिती तटकरे
आमदार अदिती तटकरे
author img

By

Published : Dec 30, 2019, 10:20 AM IST

रायगड - श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या रायगड जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदासाठी वर्णी लागली आहे. पहिल्यांदाच राज्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील इच्छुक असलेले शिवसेनेचे भरत गोगावले यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले आहे. पण, अदिती तटकरेच्या रूपाने रायगडला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

अदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. अदिती तटकरे यांनी यापूर्वी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले असून त्यानंतर आमदार होऊन राज्यमंत्री पदही मिळाले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी 1990 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविले असून 1995 ला आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, त्यावेळी युतीचे सरकार आल्याने सुनील तटकरे यांना विरोधी पक्षात बसावे लागले होते. तर 1999 मध्ये आघाडी सरकार आल्यानंतर सुनील तटकरे यांना मंत्रिपद मिळाले होते. मात्र, मुलगी अदिती तटकरे यांना पहिल्याच संधीत राज्यमंत्री पद मिळाल्याने 'बाप से बेटी सवाई' ठरली आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी वृद्धाश्रमास भेट देत वाटली नागपूरची संत्रामिठाई

रायगडात शिवसेनेच्या आमदारांची मंत्रिपदाची आशा मावळली -
रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदार अदिती तटकरे यांची राज्यमंत्रिपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रायगडला मंत्रिमंडळात नेतृत्व मिळाले आहे. रायगडात महाड, अलिबाग, कर्जत येथून शिवसेनेचे उमेदवार विधानसभेवर निवडून आले आहेत. महाडचे भरत गोगावले हे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेल्याने यावेळी मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल, अशी आशा होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होण्याची गोगावले यांची आशा धूसर झाली आहे.

हेही वाचा - किल्ल्यांवर येणाऱ्या मद्यपी पर्यटकांवर कडक कारवाई इशारा

Intro:
अदिती तटकरेच्या रूपाने रायगडला मंत्रिमंडळात स्थान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील एकमेव आमदार

आमदारकीच्या पहिल्याच संधीत अदिती तटकरे याना मंत्रिपद

जिल्ह्यात इच्छुक शिवसेनेचे आमदार मंत्रिमंडळाबाहेर

रायगड : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी राज्यात पहिल्यांदाच राज्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडली आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील इच्छुक असलेले शिवसेनेचे भरत गोगावले यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले आहे. मात्र अदिती तटकरेच्या रूपाने रायगडला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

.Body:अदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. अदिती तटकरे यांनी याआधी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले असून त्यानंतर आमदार होऊन राज्यमंत्री पदही मिळाले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी 1990 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविले असून 1995 ला आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र त्यावेळी युतीचे सरकार आल्याने सुनील तटकरे याना विरोधी पक्षात बसावे लागले होते. तर 1999 मध्ये आघाडी सरकार आल्यानंतर सुनील तटकरे यांना मंत्रिपद मिळाले होते. मात्र मुलगी अदिती तटकरे यांना पहिल्याच संधीत राज्यमंत्री पद मिळाले असल्याने बाप से बेटी सवाई ठरली आहे.
Conclusion:रायगडात शिवसेनेच्या आमदारांची मंत्रिपदाची आशा मावळली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदार अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रायगडला मंत्रिमंडळात नेतृत्व मिळाले आहे. रायगडात महाड, अलिबाग, कर्जत येथून शिवसेनेचे उमेदवार विधानसभेवर निवडून आले आहेत. महाडचे भरत गोगावले हे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेल्याने यावेळी मंत्रिपदाची माळ त्याच्या गळ्यात पडेल अशी आशा होती. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होण्याची गोगावले यांची आशा धूसर झाली आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.