ETV Bharat / state

'माझ्यावरील हक्कभंग प्रस्ताव स्वीकारा'; असे का म्हणाले सुनील तटकरे?

आपल्या विधानसभा मतदारसंघात होणार्‍या विकासकामांच्या भूमिपूजनाला आपणास निमंत्रण देत नाहीत. तसेच आपल्याला विश्‍वासात न घेता कार्यक्रम करत असल्याने आमदार योगेश कदम यांनी तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे.

खासदार सुनील तटकरे
खासदार सुनील तटकरे
author img

By

Published : Oct 24, 2020, 9:03 PM IST

रायगड - महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही गैरसमज आहे, असा संदेश जाऊ नये यासाठी माझ्यावर आमदार योगेश कदम यांनी केलेला हक्कभंग प्रस्ताव तातडीने स्वीकारावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी खासदार माझ्या मतदारसंघात येऊन विकासकामांची उद्घाटने करतात. या कार्यक्रमाला आमदार म्हणून बोलाविले जात नाही. याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव केला आहे. याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार सुनील तटकरे

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी होऊन महाविकास आघाडी स्थापन करून सरकार सत्तेवर आले आहे. उद्धव ठाकरे हे आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून कठीण काळात संयमी काम करीत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊ नये, असे ठरले आहे, असे असताना दापोली पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सभापती यांना शिवसेनेत प्रवेश दिला गेला. तसेच खासदार म्हणून मी कोकणातील विकास कामांबाबत सक्रिय असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता आहे, असेही तटकरे म्हणाले.

दरम्यान, माझ्यावर हक्कभंग प्रस्ताव सादर केला असून तो अध्यक्षांनी स्वीकारावा अशी सूचना मी करणार असल्याचे खासदार तटकरे यांनी म्हटले आहे. संसदेचा सदस्य म्हणून घटनेने दिलेला बैठकीचा अधिकार मला आहे का हेही तपासा असेही ते म्हणाले आहेत.

म्हणून हक्कभंगाचा प्रस्ताव -

आपल्या विधानसभा मतदारसंघात होणार्‍या विकासकामांच्या भूमिपूजनाला आपणास निमंत्रण देत नाहीत. तसेच आपल्याला विश्‍वासात न घेता कार्यक्रम करत असल्याने आमदार योगेश कदम यांनी तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे.

विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईची विनंती -

ही बाब अतिशय गंभीर असून माझ्या हक्कांवर गदा आणण्याचे काम सातत्याने खासदार सुनील तटकरे करत आहेत. त्यामुळे नाईलाजाने आपण 20 ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. खासदार तटकरे यांच्यावर पुढील योग्य कारवाई करण्याची विनंती केली असल्याची माहिती आ. योगेश कदम यांनी दिली. या सर्व प्रकारामुळे आता महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता आहे. आता दोन्ही पक्षाचे नेते या संदर्भात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.