ETV Bharat / state

अलिबाग-वडखळ रस्त्यासाठी आपचे आंदोलन

रस्त्यांच्या विकासाची आणि दुरुस्तीची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारच्या विभागांकडे असते. मात्र, काही रस्ते अनेक वर्षांपासून वाईट अवस्थेत असूनही त्यांच्या दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष नाही.

author img

By

Published : Oct 16, 2020, 1:55 PM IST

AAP Agitation
आप आंदोलन

रायगड : अलिबाग-वडखळ या मार्गाची खड्ड्यांमुळे वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे आज आम आदमी पार्टीतच्यावतीने (आप) आंदोलन करण्यात आले. कार्लेखिंड याठिकाणी आपचे पदाधिकारी दिलीप जोग हे कार्यकर्त्यासोबत आंदोलनाला बसले. लवकरात लवकर या महामार्गावरील खड्डे भरा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आपतर्फे देण्यात आला आहे.

अलिबाग-वडखळ रस्त्यासाठी आज आम आदमी पार्टीने आंदोलन केले

अलिबाग-वडखळ हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे. 24 किमी लांबीचा हा रस्ता असून अनेक ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रवाशांना खड्डेमय रस्त्यानेच प्रवास करावा लागत आहे. अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठी आहे. खड्ड्यामुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. तरीही रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी अधिकारी तयार नाहीत. त्यामुळे आपने आंदोलन केले, अशी माहिती दिलीप जोग यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.