ETV Bharat / state

सव्वा महिना उलटूनही बेपत्ता महिलेचा शोध नाही; खालापूर तालुक्यातील घटना - khalapur police station

1 एप्रिलला मंदा दशरथ वाघमारे (वय, 45) या इसांबाफाटा येथे भाजी विक्री करण्यास गेल्या होत्या. नेहमीप्रमाणे भाजी विक्री करून सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान एका कामासाठी इसांबा फाटा जाणार होत्या. मात्र पुन्हा घरी न परतल्याने या घटनेबाबत तिच्या मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली.

मंदा वाघमारे
मंदा वाघमारे
author img

By

Published : Apr 15, 2021, 4:00 PM IST

रायगड - भाजी विक्री करण्यास गेलेली महिला घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलीसात तक्रार दाखल केली. मात्र सव्वा महिना उलटूनही महिलेचा शोध लागला नाही. खालापूर तालुक्यातील सावरोली आनंदवाडी येथील घटना असून यासंदर्भात पोलिसांनी तपास वाढवला आहे.

1 एप्रिलला मंदा दशरथ वाघमारे (वय 45) या इसांबाफाटा येथे भाजी विक्री करण्यास गेल्या होत्या. नेहमीप्रमाणे भाजी विक्री करून सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान एका कामासाठी इसांबा फाटा जाणार होत्या. मात्र पुन्हा घरी न परतल्याने या घटनेबाबत तिच्या मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली. सव्वा महिना उलटला तरी या महिलेचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी तपासात वाढ केली आहे. पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी निलेश कांबळे हे तपास करित आहेत. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास खालापूर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.