रायगड - रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर चाकुने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. शुभम वनारसे(रा. कातळी, खडकवणे दत्तवाडी ता. पोलादपूर) असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलादपूरमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर भर दिवसा चाकूने हल्ला; हल्लेखोर फरार - शाळकरी मुलीवर हल्ला
रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर चाकुने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.आरोपीने मुलीच्या हात, चेहरा आणि पाठीवर वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
आरोपी शुभम वनारसे
रायगड - रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर चाकुने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. शुभम वनारसे(रा. कातळी, खडकवणे दत्तवाडी ता. पोलादपूर) असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव आहे.
Intro:अल्पवयीन शाळकरी मुलीवर भर दिवसा चाकूने वार, आरोपी फरार
रायगड : रायगड जिल्ह्यातील पोलादपुरमध्ये शाळकरी अल्पवयीन मुलीवर चाकुने सपासप हल्ला केल्याची खळबळजनक घटना दुपारच्या सुमारास घडली. शुभम वनारसे असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने मुलीच्या हात, चेहरा, पाठीवर वार केल्याने ती गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी तिला महाड मधील ट्रामा केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. मुलीवर वार केल्यानंतर शुभम हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. ही घटना प्रेम संबंधातून घडली की अन्य कारणाने याचा शोध पोलादपूर पोलीस घेत आहेत.Body:अल्पवयीन तरुणी ही शाळेतून येत असताना पोलादपूरमधील समर्थ नगरच्या निर्जन रस्त्यावर आली असता तरुण आरोपी शुभम याने तिच्यावर वार करून पळून गेला. तरुणी ही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली. पोलादपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन गंभीर जखमी झालेल्या मुलीला पोलादपूर मधील रुग्णालयात दाखल केले. मात्र वार हे खोलवर गेले असल्याने मुलीला तातडीने महाड येथे ट्रामा केअर सेंटर मध्ये दाखल केले आहे. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. Conclusion:मुलीवर वार केलेला आरोपी शुभम गजानन वनारसे रा. कातळी, खडकवणे दत्तवाडी ता. पोलादपूर येथे राहणार आहे. शुभम हा पाण्याच्या कैनचा पुरवठा करीत असल्याची माहिती मिळत आहे. सध्या आरोपी शुभम हा फरार असून त्याच्या विरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Last Updated : Aug 27, 2019, 7:56 PM IST