ETV Bharat / state

Raigad Bus Accident : खोपोलीतील दरीत बस कोसळून 13 जणांचा मृत्यू; केंद्र, राज्य सरकारकडून मदत जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी - Khopoli bus accident

रायगडच्या खोपोली परिसरात बस दरीत पडल्याने 13 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत. बचावकार्य पूर्ण झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले आहे. राज्य सरकारसह पंतप्रधान कार्यालयाकडून जखमींसह मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, जखमींचीही रुग्णालयात जाऊन त्यांनी विचारपूस केली आहे. तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांनी ट्विट करत घटनेवर शोक व्यक्त केला.

खासगी बस खोपोलीतील दरीत कोसळली
Raigads Khopoli Accident
author img

By

Published : Apr 15, 2023, 7:42 AM IST

Updated : Apr 15, 2023, 8:59 PM IST

खोपोलीत भीषण अपघात

रायगड : महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खोपोली येथे भरधाव वेगातील खासगी बस शिंगरोबा मंदिराजवळ दरीत कोसळली. ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. पहाटे चारच्या सुमारा प्रवासी झोपेत असतानाच काळाने घाला घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बस अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि बचाव कार्यात गुंतलेल्या टीमशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर सरकारी रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घटनास्थळी भेट - अतिशय भीषण असा हा अपघात असून त्याची माहिती समजल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत अपघात स्थळाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी अपघाताची माहिती घेत या अपघातामधील मयतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली तसेच सर्व जखमींचा वैद्यकीय खर्च शासकीय निधीमधून करण्यात येईल असे जाहीर केले. शनिवारचा दिवस हा खऱ्या अर्थाने मृत्यूचा दिवस ठरला आहे. बसमधील मयत व जखमी हे सर्व गोरेगाव मुंबई भागातील ढोल ताश्या पथकाचे कार्यकर्ते आहेत. पुण्यातील एक कार्यक्रम संपल्यानंतर ते गोरेगावला बसमधून परत जात असताना पहाटे ४ ते ४.३० घ्या दर्म्यान हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

रेस्कू पथकाची मेहनत - अपघाताची माहिती समजताच बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते, यशवंती हायकर्स, लोणावळ्यातील शिवदर्ग रेस्क पथक.वनजीव रक्षक संघटना, आपदा संघटना, आयआरबी, देवदूत यंत्रणा व खोपोलीतील अनेक रुग्णवाहिका, नागरिक मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले होते. रोपच्या सहाय्याने खोपोली, लोणावळा व मावळातील रेस्कू पथकातील कार्यकर्ते दरीत उतरत त्यांनी जखमी प्रवाश्यांना बाहेर काढत खोपोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अतिशय भीषण असा हा अपघात असून यामध्ये बसचा अक्षरशः खुळखुळा झाला आहे. मृत व जखमी हे सर्वजण साधारणतः १८ ते ३० वयोगटातील असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघात भिषण असला तरी मदतीसाठी धावणारे हात जीवाची बाजी लावत रेस्कू करत असल्याचे चित्र पहायला मिळाले.

या अपघातातील मृतांची नावे - १)जुई दिपक सावंत (वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई), २)यश सुभाष यादव(वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई), ३)कुमार. विर कमलेश मांडवकर (वय १२ वर्ष, गोरेगाव मुंबई), ४)कुमारी वैभवी साबळे (वय १५ वर्ष गोरेगाव मुंबई), ५)स्वप्नील श्रीधर धुमाळ (वय १६ वर्ष, गोरेगाव मुंबई), ६)सतिश श्रीधर धुमाळ (वय २५ वर्ष, गोरेगाव मुंबई), ७)मनीष राठोड (वय २५ वर्ष, गोरेगाव मुंबई), ८)कृतिक लोहित (वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई), ९)राहुल गोठण (वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई), १०)हर्षदा परदेशी (वय १९ वर्ष, माहीम, मुंबई), ११)अभय विजय साबळे (वय २० वर्ष, मालाड, मुंबई), १२)हरिरतन सोपान यादव (वय ४० वर्ष,जोगेश्वरी मुंबई) व १३)अनिकेत संजय जगताप (वय २६ वर्ष, गोरेगाव)

  • The loss of lives in a bus accident in Raigad, Maharashtra is deeply distressing. My condolences to the bereaved families. I pray for the speedy recovery of the injured.

    — President of India (@rashtrapatibhvn) April 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या अपघातात खालील प्रवासी जखमी झाले आहेत - १)आशिष विजय गुरव (वय १९ वर्ष, दहिसर मुंबई), २)यश अनंत सकपाळ (वय १७ वर्ष, गोरेगाव, मुंबई), ३)जयेश तुकाराम नरळकर (वय २४ वर्षे, कांदिवली, मुंबई), ४)वृषभ रवींद्र कोरमे (वय १४ वर्षे, गोरेगाव, मुंबई), ५)रुचिका सुनील हुमणे (वय १७ वर्षे, गोरेगाव, मुंबई), ६)ओंकार जितेंद्र पवार (वय २५ वर्षे खोपोली, रायगड), ७)संकेत चौकीदार (वय ३४ वर्ष, गोरेगाव, मुंबई), ८)रोशन शेलार (वय ३५ वर्ष, मुंबई), ९)विशाल अशोक विश्वकर्मा, (वय २३ वर्ष, गोरेगाव, मुंबई), १०)निखिल संजय पालकर ( वय १८ वर्ष, मुंबई), ११)युसुफ मुनीर खान (वय १३ वर्ष, मुंबई), १२)कोमल बाळकृष्ण चिले (वय ,१५ वर्ष, सांताक्रुज, मुंबई), १३)अभिजीत दत्तात्रेय जोशी (वय २० वर्षे, गोरेगाव मुंबई), १४)मोहक दिलीप सालप (वय १८ वर्षे, मुंबई), १५)दीपक विश्वकर्मा (वय २० वर्ष, गोरेगाव, मुंबई), १६)सुरेश बाळाराम अरोमुक्कंम (वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई), १७)नम्रता रघुनाथ गावनुक (वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई), १८)चंद्रकांत महादेव गुडेकर (वय २९ वर्ष, गोरेगाव, मुंबई), १९)तुषार चंद्रकांत गावडे (वय २२ वर्ष, गोरेगाव, मुंबई),२०)हर्ष अर्जुन फाळके, (वय १९ वर्ष,विरार), २१)महेश हिरामण म्हात्रे (वय २० वर्षे गोरेगाव. वर्ष, गोरेगाव मुंबई), २२)मोहक दिलीप सालप (वय १८ वर्षे, मुंबई), २३)लवकुश रणजीत कुमार प्रजापति (वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई), २४)शुभम सुभाष गुडेकर (वय २२ वर्षे, गोरेगाव, मुंबई), २५)ओम मनीष कदम (वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई), २६)सनी ओमप्रकाश राघव, (वय २१ वर्ष, खोपोली, रायगड). २७)हर्ष विरेंद्र धुरी (वय २० वर्ष, मुंबई), २८)अर्थव सिद्धार्थ कांबळे (वय १८ वर्ष, गोरेगाव ), २९)कार्तिक सुमंत भोनो (वय १९ वर्ष, मुंबई).

  • An ex-gratia is Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased in the bus mishap in Raigad. Rs. 50,000 would be given to the injured: PM @narendramodi

    — PMO India (@PMOIndia) April 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान निधीतून मदत - महाराष्ट्रातील रायगड येथील बस दुर्घटनेने दुखावले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझे भावना आहेत. मला आशा आहे की जखमी झालेले लोक लवकर बरे होतील. सरकार पीडितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. रायगडमधील बस दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे

येथेच झाला होता आणखी एक अपघात - भीषण अपघाताची तीव्रता पाहता घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले होते. बस वेगाने दरीत कोसळली. त्यामुळे अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्याचे आले आहे. फेब्रुवारी 2023 मध्येदेखील खोपोली तालुक्यात भीषण अपघात झाला होता. पेण-खोपोली मार्गावर वाक्रुळ येथे ट्रक आणि इकोची समोरासमोर जोरदार धडक झाली होती. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले होते.

  • महाराष्ट्र के रायगढ़ में हुआ सड़क हादसा दुःखद है। इस संबंध में मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी से बात हुई। स्थानीय प्रशासन राहत कार्य में लगा है। मृतकों के परिजनों के प्रति संवेदना व्यक्त करता हूँ और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूँ।

    — Amit Shah (@AmitShah) April 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

.अपघातांच्या मालिका सुरुच, विरारमध्ये शुक्रवारी भीषण अपघात - विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील रस्त्यावर एक हायवा ट्रक रस्त्यातच उलटल्याने शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकखाली सापडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. भर वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांना वाचविण्यात ट्रकचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ट्रकखाली तिघेजण सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

हेही वाचा-Hyva Truck Accident: विरारमध्ये रस्त्यातच उलटली हायवा ट्रक; तीन जणांचा मृत्यू

Last Updated : Apr 15, 2023, 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.