रायगड - जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे आपटा येथील गावाच्या मशिदीजवळ कत्तल करण्यासाठी ८ गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आली होती. रसायनी पोलीस ठाण्याला माहिती मिळताच त्यांनी केलेल्या कारवाईमुळे ६ गायी व २ वासरांना जीवदान मिळाले आहे.
मौजे आपटा येथील मशिदीजवळ गोवंशीय जातीची जनावरे सुफियान जलिल मुल्ला याने स्वत:च्या फायद्यासाठी कोठूनतरी चोरून आणून डांबून ठेवली होती. या जनावरांना त्याने कत्तलीसाठी आणले असून चारा पाण्याचीही सोय केली नव्हती. याबाबत रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ कारवाई करून ६ गाय व २ वासरांना मुक्त केले.
हेही वाचा - पेण-आंबिवली अवैध माती उत्खनन प्रकरण, ईटीएस मोजणी होऊनही कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप
कत्तल करण्यासाठी डांबून ठेवण्यात आलेल्या या गोवंशीय जनावरांची अंदाजे किंमत २६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. रसायनी पोलिसांनी या जनावरांची सुखरुप सुटका करून त्यांना सुरक्षिततेसाठी कल्याण येथील गो शाळेत पाठविले आहे.
हेही वाचा - रायगडमध्ये तेजस एक्सप्रेसच्या धडकेने वाडा येथील तरुणाचा मृत्यू
याप्रकरणी आरोपी सुफियान जलिल मुल्ला यांच्या विरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागवल्याबाबत प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तर, उपविभागीय पोलीस निरीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कांबळे अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्ग होणार सुसाट; जून 2020 पर्यंत रुंदीकरण होणार पूर्ण !