ETV Bharat / state

जिल्ह्यात 65.57 टक्के मतदान, 72 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद - रायगड विधानसभा निवडणूक बातम्या

जिल्ह्यातील 7 मतदारसंघात 22 लाख 66 हजार 679 मतदार असून सोमवारी 2 हजार 714 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 6 लाख 93 हजार 103 पुरुष, 6 लाख 47 हजार 018 महिला आणि 1 तृतीयपंथी अशा एकूण 13 लाख 40 हजार 122 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांचा टक्का वाढलेला आहे. मतदान प्रक्रियेदरम्‍यान काही ठिकाणी तांत्रिक अडथळे येत होते

जिल्ह्यात 65.57 टक्के मतदान
author img

By

Published : Oct 21, 2019, 11:50 PM IST

रायगड - राज्‍य विधानसभेच्‍या निवडणुकीसाठी सोमवारी जिल्‍ह्यात किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. जिल्‍ह्यातील 7 मतदारसंघातील 78 उमेदवारांचे भवितव्‍य मतदान यंत्रात बंद झाले आहे. मतदानाच्‍या वेळेपर्यंत जिल्‍ह्यात 65.57 टक्‍के मतदान झाले असून 2014 च्या तुलनेत मतदान 4 टक्याने घटले आहे. त्यामुळे या घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार हे 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतर कळणार आहे.

जिल्ह्यात 65.57 टक्के मतदान

रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, महाड, उरण, श्रीवर्धन या 7 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले 15 दिवस राजकीय पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. यावेळी एकूण 78 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये पनवेल मतदारसंघात 10, कर्जत 11, उरण 08, पेण 14, अलिबाग 13, श्रीवर्धन 14 आणि महाडमध्ये 8 उमेदवारांचा समावेश आहे.

हेही वाचा - पनवेलमधील मतदान केंद्रावर स्वागत असं की, मतदारही झाले खुश !
प्रत्‍यक्ष मतदान प्रक्रियेला सोमवारी सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. 9 वाजेपर्यंत मतदान अतिशय संथगतीने सुरू होते. त्यामुळे अवघे 6.50 टक्‍के इतकेच मतदान झाले. नंतर मात्र, मतदानाचा वेग हळूहळू वाढत जाऊन 11 वाजेपर्यंत मतदानाचा टक्‍का 17.67 टक्‍क्यांवर पोहोचला होता. त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत 46 टक्‍के इतके मतदान झाले आणि 5 पर्यंत मतदानाचा आकडा 58.98 टक्क्यांवर पोहोचला होता.

जिल्ह्यातील 7 मतदारसंघात 22 लाख 66 हजार 679 मतदार असून सोमवारी 2 हजार 714 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 6 लाख 93 हजार 103 पुरुष, 6 लाख 47 हजार 018 महिला आणि 1 तृतीयपंथी अशा एकूण 13 लाख 40 हजार 122 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांचा टक्का वाढलेला आहे. मतदान प्रक्रियेदरम्‍यान काही ठिकाणी तांत्रिक अडथळे येत होते. ईव्‍हीएम किंवा व्‍हीव्‍हीपॅट यंत्रातील बिघाडामुळे मतदारांना काही काळ तात्कळत उभे रहावे लागत होते. परंतु प्रशासनाच्‍या तत्‍परतेमुळे हे सर्व बिघाड दूर करून पुढे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

हेही वाचा - रायगडमध्ये मतदानाला शांततेत सुरुवात, पोलिसांचा चोख बंदोबस्त

उमेदवारांबरोबरच केंद्राचे प्रमुख पदाधिकारी सकाळीच मतदान करून दौऱ्यावर निघाले. दरम्‍यान मतदान केंद्रांवर मतदारांच्‍या गाठीभेटी सुरू होत्‍या, मतदारही त्‍यांचे हसतमुखाने स्‍वागत करत होते. आजच्‍या मतदानात तरुणाईदेखील आघाडीवर असल्‍याचे चित्र होते. नवमतदारांमध्‍ये अधिक उत्‍साह दिसत होता. तसेच मतदान करून आल्‍यानंतर शाई लावलेले बोट दाखवत सेल्‍फी पॉइंटवर सेल्‍फी काढत होते.

मतदारांना प्रोत्‍साहित करण्‍यासाठी काही ठिकाणी संपूर्णपणे महिला संचलित सखी मतदान केंद्र सुरू करण्‍यात आले होते. तर, काही ठिकाणी मतदान प्रक्रिया संपूर्णपणे दिव्‍यांग कर्मचारी सांभाळत होते. जिल्‍हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सकाळी अलिबागमधील रामनाथ प्राथमिक शाळेतील सखी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्‍क बजावला. तेथे महिला कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्‍प देवून जिल्‍हाधिकारी यांचे स्‍वागत केले. ऊन पावसाची तमा न बाळगता सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

रुग्‍णांसाठी विशेष सुविधा
रुग्‍णालयात उपचार घेत असलेले रुग्‍ण मतदानाच्‍या हक्‍कापासून वंचित राहू नयेत, त्‍यांना लोकशाहीने दिलेला हक्‍क बजावता यावा यासाठी रायगड जिल्‍हा प्रशासनाने शक्‍कल लढवली. शासकीय रुग्‍णालयात दाखल रुग्‍णांना मतदान केंद्रापर्यंत नेण्‍यासाठी स्‍वतंत्र रुग्‍णवाहिकांची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली होती. जिल्‍ह्यातील सर्व सरकारी रुग्‍णालयात ही सुविधा उपलब्ध होती, त्‍याचा रुग्‍णांनी लाभ घेतला. अनेक रुग्‍णांना मतदानास प्रोत्साहित करण्‍यासाठी रुग्‍णालय प्रशासन तसेच निवडणूक विभागातील कर्मचारी प्रयत्‍न करत होते. जिल्‍हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी स्‍वतः मतदानासाठी आलेल्‍या रुग्‍णांची आस्‍थेने चौकशी केली. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत निवडणूक विभागाचे निरीक्षक देखील हजर होते. ही सुविधा उपलब्‍ध करून मतदानाचा हक्‍क बजावण्‍याची संधी दिल्‍याबद्दल रुग्‍णांनी देखील जिल्‍हा प्रशासनाचे आभार मानले. या शिवाय प्रत्‍येक मतदान केंद्रावर दिव्‍यांग मतदारांसाठी व्‍हीलचेअरची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती.

पावसाची उघडीप आणि दिलासा
मागील 2-3 दिवसांपासून रायगड जिल्‍ह्यात परतीच्‍या पावसाच्‍या सरी कोसळत होत्‍या. सोमवारी पहाटेच्‍या सुमारासही पाऊस झाल्‍याने मतदान प्रक्रियेवर पावसाचे सावट कायम होते. त्‍यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते चिंतेत होते. मात्र, 11 वाजल्‍यानंतर चक्‍क ऊन पडल्‍याने सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला.

रायगड जिल्ह्यातील मतदारसंघ टक्केवारी 2019
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पनवेल 56, कर्जत 69, उरण 73, पेण 66, अलिबाग 69, श्रीवर्धन 61, महाड 65 जिल्ह्यात असे एकूण 65.57 टक्के मतदान झाले आहे.

रायगड जिल्ह्यातील मतदारसंघ टक्केवारी 2014
गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील पनवेल 66.88, कर्जत 75.40, उरण 77.93, पेण 71.63, अलिबाग 73.35, श्रीवर्धन 64.20 महाड 66.10 असे एकूण 69.49 टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र, 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 4 टक्क्याने मतदान घटले आहे.

हेही वाचा - मतदानावर पावसाचे सावट, रायगडमध्ये 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

Intro:जिल्ह्यात 65.57 टक्के मतदान, 2014 च्या तुलनेत4 टक्याने घटला टक्का

72 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत कैद

24 ऑक्टोबरला होणार मतमोजणी

रायगड : राज्‍य विधानसभेच्‍या निवडणूकीसाठी आज रायगड जिल्‍हयात किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. जिल्‍हयातील 7 मतदार संघातील 78 उमेदवारांचे भवितव्‍य मतदान यंत्रात बंद झाले. मतदानाच्‍या वेळेपर्यत जिल्‍हयात 65.57 टक्‍के मतदान झाले असून 2014 च्या तुलनेत 4 टक्याने मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे या घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला होणार हे 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतर कळणार आहे.

रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, महाड, उरण, श्रीवर्धन या सात विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा दिवस निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकिय पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. जिल्ह्यात एकूण 78 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये पनवेल मतदार संघात 10, कर्जत 11,  उरण 08, पेण 14, अलिबाग 13, श्रीवर्धन 14, 
महाड मध्ये 8 उमेदवारांचा समावेश आहे.

आज सकाळी 7 वाजता प्रत्‍यक्ष मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सकाळी मतदान अतिशय संथगतीने सुरू होते. 9 वाजेपर्यंत अवघे 6.50 टक्‍के इतकेच मतदान झाले होते. नंतर हळूहळू मतदानाचा वेग वाढत गेला. नागरीक मतदानसाठी बाहेर पडू लागले आणि 11 वाजता मतदानाचा टक्‍का 17.67 टक्‍कयांवर पोहोचला. हळूहळू ऊन वाढत गेले तसा मतदानाचा वेग पुन्‍हा मंदावला. दुपारी तीन वाजेपर्यंत 46 टक्‍के इतके मतदान झाले. पाच वाजेपर्यत 58.98 टक्के मतदान झाले. मतदान

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात 22 लाख 66 हजार 679 मतदार असून 2714 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया आज पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यत पुरुष 6 लाख 93 हजार 103, महिला 6 लाख 47 हजार 018, एक तृतीय पंथी असे एकूण 13 लाख 40 हजार 122 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांचा टक्का वाढलेला आहे.

 मतदान प्रक्रियेदरम्‍यान काही ठिकाणी तांत्रिक अडथळे येत होते. ईव्‍हीएम किंवा व्‍हीव्‍हीपॅट यंत्रातील बिघाडामुळे मतदारांना काळी काळ ताठकळत उभे रहावे लागत होते. परंतु प्रशासनाच्‍या तत्‍परतेमुळे हे सर्व बिघाड दूर करून पुढे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

उमेदवारांबरोबरच त्‍यांचे प्रमुख पदाधिकारी सकाळीच मतदान करून दौऱ्यावर निघाले. दरम्‍यान मतदान केंद्रांवर मतदारांच्‍या गाठीभेटी सुरू होत्‍या. मतदारही त्‍यांचे हसतमुखाने स्‍वागत करत होते. आजच्‍या मतदानात तरूणाई आघाडीवर असल्‍याचे चित्र होते. नवमतदारांमध्‍ये अधिक उत्‍साह दिसत होता. मतदान करून आल्‍यानंतर शाई लावलेले बोट दाखवत सेल्‍फी पॉइंटवर सेल्‍फी काढत होते.  

 Body:
मतदारांना मतदानाकरिता प्रोत्‍साहीत करण्‍यासाठी काही ठिकाणी संपूर्णपणे महिला संचालीत सखी मतदान केंद्र सुरू करण्‍यात आली होती. तर काही ठिकाणी मतदान प्रक्रिया संपूर्णपणे दिव्‍यांग कर्मचारी सांभाळत होते. जिल्‍हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सकाळी अलिबागमधील रामनाथ प्राथमिक शाळेतील सखी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्‍क बजावला. तेथे महिला कर्मचाऱ्यानी गुलाबपुष्‍प देवून जिल्‍हाधिकारी यांचे स्‍वागत केले. ऊन पावसाची तमा न बाळगता सर्व नागरीकांनी आपला मतदानाचा हक्‍क बजाववा असे आवाहन त्‍यांनी केले.

---------------------------

रूग्‍णांसाठी विशेष सुविधा

रूग्‍णालयात उपचार घेत असलेले रूग्‍ण मतदानाच्‍या हक्‍कापासून वंचित राहू नयेत, त्‍यांना लोकशाहीने दिलेला हक्‍क बजावता यावा यासाठी रायगड जिल्‍हा प्रशासनाने शक्‍कल लढवली. शासकीय रूग्‍णालयात दाखल रूग्‍णांना मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत नेण्‍यासाठी स्‍वतंत्र रूग्‍णवाहिकांची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली होती. जिल्‍हयातील सर्व सरकारी रूग्‍णालयात ही सुविधा होती. त्‍याचा रूग्‍णांनी लाभ घेतला. अनेक रूग्‍णांना मतदानासाठी प्रवृत्‍त करण्‍यासाठी रूग्‍णालय प्रशासन तसेच निवडणूक विभागातील कर्मचारी प्रयत्‍न करत होते. जिल्‍हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी स्‍वतः मतदानासाठी आलेल्‍या रूग्‍णांची आस्‍थेने चौकशी केली. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत निवडणूक
विभागाचे निरीक्षक देखील हजर होते. या मतदारांच्‍या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ही सुविधा उपलब्‍ध करून मतदानाचा हक्‍क बजावण्‍याची संधी दिल्‍याबददल रूग्‍णांनी देखील जिल्‍हा प्रशासनाचे आभार मानले. या शिवाय प्रत्‍येक मतदान केंद्रावर दिव्‍यांग मतदारांसाठी व्‍हीलचेअरची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती.Conclusion:पावसाची उघडीप आणि दिलासा  

मागील दोन तीन दिवसांपासून रायगड जिल्‍हयात परतीच्‍या पावसाच्‍या सरी कोसळत होत्‍या. आज पहाटेच्‍या सुमारासही पाऊस झाल्‍याने आजच्‍या मतदान प्रक्रियेवर पावसाचे सावट कायम होते. त्‍यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते चिंतेत होते. सकाळी ढगाळ वातावरण होते मात्र 11 वाजल्‍यानंतर चक्‍क ऊन पडल्‍याने सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला.

------------------

रायगड विधानसभा टक्केवारी 2019

पनवेल 56, कर्जत 69, उरण 73, पेण 66, अलिबाग 69, श्रीवर्धन 61, महाड 65, एकूण मतदान 65.57 टक्के झाले आहे

2014 विधानसभा मतदारसंघ टक्केवारी

पनवेल 66.88, कर्जत 75.40, उरण 77.93, पेण 71.63, अलिबाग 73.35, श्रीवर्धन 64.20
महाड 66.10 एकूण 69.49 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 4 टक्याने मतदान घटले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.