ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात 629 खासगी तर 10 शासकीय इमारती धोकादायक

या सर्व इमारतीमधील रहिवाशांना व मालकांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम 1965 च्या कलम 195 अन्वये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर इमारतीमधील रहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात 629 खाजगी तर 10 शासकीय इमारती धोकादायक
author img

By

Published : Jul 17, 2019, 9:59 PM IST

रायगड - जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद, नगरपंचायत यांच्याकडून धोकादायक इमारतीबाबत अहवाल सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले होते. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 629 खासगी व 10 शासकीय अशा एकूण 639 इमारती धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. या इमारतीच्या मालकांना व रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यात 629 खाजगी तर 10 शासकीय इमारती धोकादायक

मुंबई, पुणे येथे भिंत कोसळून तसेच तीवरे दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग, पनवेल, महाड, नगरपरिषद, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते.

अलिबाग 12, मुरुड 4, पेण 9, पनवेल महानगर पालिका 231, उरण 74 (66 खासगी, 8 शासकीय), कर्जत 226, माथेरान 6 ( 4 खासगी, 2 शासकीय), खोपोली 3, रोहा 10, महाड 43 तर श्रीवर्धन 11 अशा एकूण 639 धोकादायक इमारती महानगरपालिका व नगरपरिषद परिसरात असल्याचा अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. पनवेल व कर्जत शहरात सर्वाधिक धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे.

या सर्व इमारतीमधील रहिवाशांना व मालकांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम 1965 च्या कलम 195 अन्वये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर इमारतीमधील रहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, तळा, खालापूर, या नगरपंचायत विभागाने जिल्हाधिकारी यांच्या लेखी निर्देशानंतरही अद्याप आपले अहवाल सादर केलेले नाहीत.

Intro:
जिल्ह्यात 629 खाजगी तर 10 शासकीय इमारती धोकादायक

धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याचे निर्देश

रायगड : जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद, नगरपंचायत यांच्याकडून धोकादायक इमारतीबाबत अहवाल सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले होते. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 629 खाजगी व 10 शासकीय अशा एकूण 629 इमारती धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. या इमारतीच्या मालकांना व रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

Body:मुंबई, पुणे येथे भिंत कोसळून तसेच तीवरे दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग, पनवेल, महाड तसेच नगरपरिषद, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते.

अलिबाग 12, मुरुड 4, पेण 9, पनवेल महानगर पालिका 231, उरण 74 (66 खाजगी, 8 शासकीय), कर्जत 226, माथेरान 6 ( 4 खाजगी, 2 शासकीय), खोपोली 3, रोहा 10, महाड 43 तर श्रीवर्धन 11 अशा एकूण 629 धोकादायक इमारती महानगरपालिका व नगरपरिषद परिसरात असल्याचा अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. पनवेल व कर्जत शहरात सर्वाधिक धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे.

Conclusion:या सर्व इमारतीमधील रहिवाशांना व मालकांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम 1965 च्या कलम 195 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर इमारतीमधील रहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, तळा, खालापूर, या नगरपंचायत विभागाने जिल्हाधिकारी यांच्या लेखी निर्देशानंतरही अद्याप आपले अहवाल सादर केलेले नाहीत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.