ETV Bharat / state

रायगड दरड दुर्घटना अपडेट : आतापर्यंत 44 मृतदेह आढळले; अद्याप 41 जणांचा शोध सुरुच

author img

By

Published : Jul 24, 2021, 9:25 AM IST

Updated : Jul 24, 2021, 10:43 AM IST

तळई गावाची लोकसंख्या 241 असून त्यापैकी 109 व्यक्ती गावाबाहेर होत्या. 41 व्यक्तींची सुटका करण्यात आली. 6 व्यक्ती जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत 13 बैल व 20 गाई अशा एकूण 33 जनावरांचा मृत्यू झालेला आहे.

raigad landslide incident
रायगड दरड दुर्घटना अपडेट

रायगड - महाडमधील तळई येथे दरड कोसळल्याच्या घटनेत 85 व्यक्ती अडकल्या असून त्यापैकी 23 जुलैच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 44 मृतदेह आढळले आहेत. तर अद्यापही 41 व्यक्ती बेपत्ता आहेत. रायगड जिल्हा प्रशासनामार्फत ही माहिती देण्यात आली.

तळई गावाची लोकसंख्या 241 असून त्यापैकी 109 व्यक्ती गावाबाहेर होत्या. 41 व्यक्तींची सुटका करण्यात आली. 6 व्यक्ती जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत 13 बैल व 20 गाई अशा एकूण 33 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. राष्ट्रीय आपत्ती बचाव पथक, स्थानिक बचाव पथक व नागरिकांच्या मदतीने शोध कार्य अद्यापही सुरू आहे.

ओळख पटली -

बचाव कार्यादरम्यान आढळलेल्या 44 पैकी 33 मृतदेहांची ओळख पटली आहे.

raigad landslide incident
मृतांची यादी
raigad landslide incident
बेपत्ता लोकांची यादी
raigad landslide incident
बेपत्ता लोकांची यादी

महाड व पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन -

administration appeal
प्रशासनाकडून करण्यात आलेले आवाहन
  • मौजे केवनाळे ता. पोलादपूर येथेही अतिवृष्टीमुळे दरड कोसळून 5 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधण्यात आले आहेत. या दुर्घटनेत 6 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
  • तर मौजे साखर सुतारवाडी ता. पोलादपूर येथेही 5 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. इतर 16 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर अजूनही 1 व्यक्ती बेपत्ता आहे.

रायगड जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी अहवाल सकाळी ८ वा.

water level report
नद्यांची पाणी पातळी अहवाल

Last Updated : Jul 24, 2021, 10:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.