रायगड : दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून, आज दिवसभरात 402 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोमाग्रस्तांचा आकडा हा ९ हजारांच्या पुढे गेला आहे. आज दिवसभरात 266 रुग्ण बरे झाले असून, 19 जणांचा मृत्य झाला आहे. सध्या 3539 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आनंदाची बाब म्हणजे 5176 जणांनी आतापर्यत कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव हा रोज वाढत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात अकरा दिवसाचा लॉकडाऊनही सुरू झाला आहे. या लॉकडाऊनच्या दोन दिवस आधी नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याने कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे. आज पनवेल शहर 134, पनवेल ग्रामीण 63, उरण 17, खालापूर 29, कर्जत 26, पेण 32 ,अलिबाग 50, रोहा 16 , महाड 4, मुरुड 4, सुधागड 1, श्रीवर्धन 13, म्हसळा 8, महाड 9 असे एकूण 402 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्ह्यात आधी पनवेल आणि उरण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत होता. मात्र आता ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. आतापर्यत जिल्ह्यात 9 हजार 11 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 3539 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यत 296 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आतापर्यत 5176 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू झाले आहे. हे लॉकडाऊन कडक असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी याचा उपयोग होणार की, नाही हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.