ETV Bharat / state

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक ट्रेलरचा अपघात; 4 जखमी - Mumbai-Pune highway accident Raigad

मुबंई-पुणे महामार्गावर बोरघाटात ट्रक आणि ट्रेलरचा अपघात होऊन चार जण जखमी झाले आहेत. चारपैकी एकाची प्रकृती नाजूक असून त्याला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Mumbai-Pune highway accident
मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक ट्रेलरचा अपघात
author img

By

Published : Jan 5, 2021, 7:44 PM IST

रायगड - मुबंई-पुणे महामार्गावर बोरघाटात ट्रक आणि ट्रेलरचा अपघात होऊन चार जण जखमी झाले आहेत. चारपैकी एकाची प्रकृती नाजूक असून त्याला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मुंबई लेनवर हा अपघात झाला असून काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक ट्रेलरचा अपघात

दोघे केबिनमध्ये अडकले

मुंबई-पुणे महामार्गावर पुणेकडून मुंबईकडे ट्रक चालला होता. बोरघाटात ट्रक आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक समोर चाललेल्या ट्रेलरवर जाऊन धडकला. हा अपघात एवढा मोठा होता की यात ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. केबिनमध्ये दोघेजण अडकले होते, तर दोन जण सुखरूप बाहेर पडले. कटरने केबीन कापून अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले.

मदतकार्य करून दोघांना काढले बाहेर

अपघाताची माहिती कळताच बोरघाट पोलीस, आयआरबी व देवदूत पथकाने मदत कार्य सुरू केले व ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा - तिळगुळ घ्या गोडगोड बोला : तिळाचे मोदक आणि तिळगुळ पाककृती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.