रायगड- पेण शहरातील 3 तरुणांना एका मालगाडीने चिरडल्याची घटना घडल्याने शहरात दुःखाची लाट पसरली आहे. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. सदर घटना ही अपघात आहे की घातपात, ही चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी रात्री सुनील वर्मा (वय 25), सुशील वर्मा (वय 24) आणि निखिल गुप्ता (वय 25) हे तीन तरुण पेण रेल्वे स्थानकापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर रेल्वे ट्रॅकवर गेले होते. यावेळी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पेण रेल्वे स्थानकावरून एक मालगाडी रोहाच्या दिशेने जात असताना या मालगाडीने ट्रॅकवर बसलेल्या या 3 तरुणांना चिरडले.