ETV Bharat / state

पंतप्रधान सहायता निधीकडून कोकणासाठी २७९ व्हेंटिलेटर

पंतप्रधान सहायता निधीतून कोकणातील पाच जिल्हा रुग्णालयांना २७९ व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले, अशी माहिती भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे.

आमदार निरंजन डावखरे
आमदार निरंजन डावखरे
author img

By

Published : Nov 18, 2020, 4:22 PM IST

पेण (रायगड) - कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान सहायता निधीतून कोकणातील पाच जिल्हा रुग्णालयांना २७९ व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री निधीकडून रुग्णालयांना काहीही मदत देण्यात आली नाही. केवळ रत्नागिरी येथील कोरोना आरटीपीसीआर लॅबसाठी दिलेले १ कोटी ७ लाख रुपये वगळता मुख्यमंत्री निधीकडून कोकणाला ठेंगा दाखवून उपेक्षा करण्यात आली, याकडे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले आहे.

कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीकडून कोकणातील पाच जिल्ह्यात कोणती मदत व साहित्य पुरविण्यात आले, याबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून माहिती मागविली होती. त्यानुसार कोकणातील पाच जिल्ह्यांत पंतप्रधान सहायता निधीतून २७९ व्हेंटिलेटर, २६५ जम्बो सिलिंडर आणि ३७१ थ्री टाइप सिलिंडर पुरविण्यात आले. तर मुख्यमंत्री सहायता निधीकडून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी १ कोटी ७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला, अशी माहिती संबंधित शल्यचिकित्सकांकडून पत्राद्वारे देण्यात आली आहे.

कोरोना चाचणी लॅबसाठी निधी

पंतप्रधान सहायता निधीतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाला ४६, पालघरमध्ये ४४, रत्नागिरीत ४४, सिंधुदुर्गात ४७ आणि रायगडमध्ये ९८ व्हेंटिलेंटर पुरविण्यात आले. रायगड जिल्हा शासकिय रुग्णालयाला व्हेंटिलेटरबरोबरच २६५ जम्बो सिलिंडर व ३७१ थ्री टाइप सिलिंडर पुरविण्यात आले. तर मुख्यमंत्री सहायता निधीतून केवळ रत्नागिरी जिल्ह्याला कोरोना चाचणी लॅबसाठी निधी दिला गेला. उर्वरित जिल्हा रुग्णालयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक रुपयाही मिळालेला नाही, असे आमदार निरंजन डावखरे यांचे म्हणणे आहे.

कोकणाची उपेक्षा

ठाणे जिल्ह्यासह कोकणातील जिल्हा रुग्णालयांकडे राज्य सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. किमान कोरोना आपत्तीत जिल्हा रुग्णालयांना भरीव मदतीची अपेक्षा होती. मुख्यमंत्री सहायता निधीत कोट्यवधी रुपयांचा निधी जमा झाला असतानाही कोकणाची उपेक्षा करण्यात आली. महाविकास आघाडीकडून कोकणाकडे सातत्याने दुर्लक्ष जात असून आताही कोकणाला ठेंगा दाखविण्यात आला, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

पंतप्रधान सहायता निधीला दिलेली मदत सार्थकी

कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान सहायता निधीऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देण्याचा आग्रह दिला जात होता. मात्र, भाजपचे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबरच सामान्य जनतेने पंतप्रधान सहायता निधीला दिलेली मदत सार्थकी लागली, अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.