ETV Bharat / state

खोपोलीत बिहारी कुटुंबातील 14 वर्षीय मुलीची बापाकडून निर्घृण हत्या - बिहारमधील कुटूंब आणि हत्या

खोपोली परीसरात एका मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. बिहारमधून कामानिमित्त आलेल्या कुटुबातील व्यक्तीनेच तिचा खून केल्याचे स्पष्ट आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बिहारी कुटुंबातील 14 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या

author img

By

Published : Feb 6, 2021, 12:41 AM IST

Updated : Feb 6, 2021, 2:28 AM IST

रायगड - खोपोली शहरामध्ये अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. बिहार मधून आलेले एक कुटूंब मागील तीन दिवस एका लॉजवर वास्तव्यास असताना अचानक लॉज सोडून बाहेर पडले. त्यानंतर त्यातील कुटूंब प्रमुख असलेल्या पुरुषाने पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींना मारहाण सुरू केली. त्यानंतर आई आणि मुलींनी त्याच्या तावडीतून पळ काढला. मात्र ,त्यामध्ये सुटका करून घेण्यास एक मुलगी अपयशी ठरली. त्यामुळे सुटका झालेल्या मायलेकींनी थेट पोलीस स्टेशन गाठून मुलीच्या जीवास धोका असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्या व्यक्तीचा आणि मुलीचा शोध सुरू केला. मात्र, दुर्दैवाने पोलिसांना त्या १४ वर्षीय मुलीचा जीव वाचविण्यात अपयश आले. पाताळगंगा नदी पात्रात त्या मुलीचा मुंडके नसलेला देह आढळून आला आहे.

कुटुंबातील 14 वर्षीय मुलीची बापाकडून निर्घृण हत्या

मुलींसह महिलेस मारहाण, दोघींना पळण्यात यश-

या थरकाप उडवणाऱ्या घटनेची अधिक माहिती अशी की, बिहार येथील आई वडील आणि दोन मुली असे चार जणांचे एक कुटुंब खोपोलीमध्ये कामानिमीत्त आले होते. त्यासाठी ते खोपोली शहरातील एका लॉजवर वासव्यास राहिले होते. गेल्या तीन दिवसांपासून वास्तव्यासाठी असलेले हे कुटुंब शुक्रवारी (5 फेब्रुवारी) पहाटे 4 वाजता राजेंद्र लॉजमधून बाहेर पडले. त्यानतंर या कुटुंबीयांसोबत असणा-त्या व्यक्तीने सर्वांना एका निर्जनस्थळी आणले. तिथे आल्यावर मात्र त्याने त्या दोन मुली आणि त्यांच्या आईस मारहाण कऱरण्यास सुरुवात केली.

त्यावेळी एका 12 वर्षाच्या मुलीने आणि तिच्या आईने तेथुन कसाबसा पळ काढला. मुख्य रस्त्यावर येताच त्या दोघींनी काही लोकांच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व हकिकत सांगितली. तसेच त्या दुसऱ्या मुलीच्या जीवास धोका असल्याचे गांभीर्य पोलिसांना सांगितले. त्यानतंर उप पोलीस निरीक्षक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदार महिलेने सांगितल्या वर्णनानुसार खोपोली परिसरात त्या मुलीचा आणि व्यक्तीचा शोध सुरू केला.

केवळ धडच आढळले-

पोलिसांनी दिवसभर शोध मोहीम राबविल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास मात्र, पोलिसांना खोपोली शिळफाटा येथील साई रिव्हर रिझाँर्टच्या पाठिमागच्या बाजुस असलेल्या पाताळगंगा नदी पात्रात एका युवतीचा मृतदेह आढळून आला. मात्र, त्या मृतदेहाचा शीरच्छेद करण्यात आला होता. केवळ धडच त्या ठिकाणी पडलेले होते. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीचे शीर शोधण्यासह आरोपीचाही शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे, अतिरीक्त पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, खालापुर पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, साह्य पो नि अमोल वालसंग आदि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Last Updated : Feb 6, 2021, 2:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.